advertisement

इन्स्टावर लाखो फॉलोअर्स, महाराष्ट्राची लेक अडकली प्रेमाच्या जाळ्यात, लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट, 4 दिवस सडत राहिला मृतदेह

Last Updated:

व्हॅलेंटाईन वीक सुरू असतानाच प्रेमाचा विदारक अंत करणारी एक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं, पण या प्रेमाचा शेवट खुनाने झाला.

News18
News18
व्हॅलेंटाईन वीक सुरू असतानाच प्रेमाचा विदारक अंत करणारी एक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं, पण या प्रेमाचा शेवट खुनाने झाला. गोंदियाच्या एका तरुणीची तिच्या पतीनेच गळा दाबून हत्या केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपीनं पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद करून तो पाण्याच्या टाकीत फेकून दिला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये १२ फेब्रुवारी रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली जीवघेणी

मूळची गोंदिया येथील असलेली अशरफी ऊर्फ सिया (३३) ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स होते. यातूनच तिची ओळख भोपाळमधील समीर नावाच्या रिक्षाचालकाशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आपल्या सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून सिया घर सोडून भोपाळला आली. तिथे दोघांनी लग्नही केलं.
advertisement

समीरचं तिसरं लग्न आणि घरगुती वाद

तपासात समोर आले की, समीरचं हे तिसरं लग्न होतं. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती, तर दुसरी पत्नी त्याच्यासोबतच राहत होती. सियाला घरी आणल्यानंतर समीरने सुरुवातीला ती आपली मेहुणी असल्याचं शेजाऱ्यांना सांगितलं. मात्र, नंतर त्यांच्या लग्नाचं सत्य समोर आलं. एकाच घरात दोन पत्नींना ठेवण्यावरून समीरच्या घरात सतत वाद होऊ लागला. याच वादामुळे त्याची दुसरी पत्नी काही दिवसांपूर्वीच माहेरी निघून गेली होती.
advertisement
दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी परिसरातील एका पाण्याच्या टाकीत एक संशयास्पद लोखंडी पेटी आढळली. पोलिसांनी ती पेटी उघडली असता त्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. मृतदेहाच्या हातावर 'दीप' नावाचा टॅटू आणि जन्म तारीख कोरलेली होती. या खुणांच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख 'सिया' म्हणून पटवली. यानंतर हे हत्याकांड उघडकीस आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी समीर आणि सिया यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. रागाच्या भरात समीरनं सियाचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने चक्क त्याच्या दुसऱ्या लग्नात हुंड्यात मिळालेली पत्र्याची पेटी काढली. त्या पेटीत सियाचा मृतदेह कोंबला आणि ती पेटी घराशेजारील पाण्याच्या टाकीत फेकून दिली. धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर समीर अत्यंत निर्धास्तपणे आपल्या दुसऱ्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूरला गेला होता.
advertisement

आरोपी पती अटकेत

मृतदेह तीन-चार दिवस जुना असल्याने तो कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून संशयित पती समीरला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात असून या घटनेने गोंदिया आणि भोपाळ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इन्स्टावर लाखो फॉलोअर्स, महाराष्ट्राची लेक अडकली प्रेमाच्या जाळ्यात, लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट, 4 दिवस सडत राहिला मृतदेह
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement