Jalgaon Accident : भाजीपाला घेऊन घरी निघाले, पण वृद्धाला रस्त्यातच मृत्यूने गाठलं, जळगावमध्ये हृदयद्रावक घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या एका वृद्धाला डंपरेन चिरडल्याची घटना घडली आहे. प्रभाकर पाटील असे या 57 वर्षीय मृत वृद्धाचे नाव आहे.
Jalgaon Accident News : विजय वाघमारे, जळगाव : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या एका वृद्धाला डंपरेन चिरडल्याची घटना घडली आहे. प्रभाकर पाटील असे या 57 वर्षीय मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना जळगाव शहरातील कालिंका माता चौकात घडली आहे.या घटनेनंतर जमाव सतंप्त झाला होता आणि परिसरात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव शहरातील कालिंका माता चौकातून प्रभाकर पाटील हे भाजीपाला घेऊन घरी जात होते. या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने त्यांना चिरडल्याची घटना घडली होती.या घटनेत प्रभाकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान डंपर चालक हा मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. तसेच डंपरचे चाक थेट तोंडावरून गेल्यामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. याच चौकात साधारण वर्षभरापूर्वी डंपरने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली होती. त्यामुळे येथे अद्ययावत सिग्नल व्यवस्था सुरू करावी तसेच 24 तास वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी नागरिकांनी केली होती.पण या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने हे अपघात घडत आहे.त्यामुळे सतप्त नागरीकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 9:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Accident : भाजीपाला घेऊन घरी निघाले, पण वृद्धाला रस्त्यातच मृत्यूने गाठलं, जळगावमध्ये हृदयद्रावक घटना






