advertisement

मोहम्मद sss लेकाचा निपचित देह पाहून पित्याचा टाहो, क्षणात सगळं संपलं, वडिलही गेले

Last Updated:

बाप लेकाच्या मृत्युमुळे ठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : चोपडा तालुक्यातून जळगावकडे येत असताना घार्डी फाटा परिसरात ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत भीषण अपघात होऊन बाप–लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात मोहम्मद लुकमान ठोके (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे वडील लुकमान मुसेखा ठोके (वय ७४, रा. लासुर, ता. चोपडा) यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे ठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील लासुर येथील रहिवासी असलेले मोहम्मद ठोके हे आपल्या आजारी वडिलांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दुचाकीवरून नेत होते. दरम्यान, जळगावकडे येत असताना घार्डी फाटा रस्त्यावर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले आणि दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले.
advertisement
या भीषण अपघातात मोहम्मद ठोके यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या वडिलांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच ठोके कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी महिलांचा आणि नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
advertisement

ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल

अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास सुरू आहे. एका क्षणात बाप–लेकाचे प्राण गेल्याने लासुर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाचोरा–लोहारा मार्गावर मोठी दुर्घटना

जळगावच्या पाचोरा–लोहारा मार्गावर आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. लोहाराकडून पाचोऱ्याकडे येत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या धावत्या बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. यामुळे बस रस्त्याच्या कडेला पलटी होत भीषण अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र बसच्या वाहकाने प्रसंगावधान दाखवत तत्काळ बसवर नियंत्रण मिळवले. या घटनेत बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोहम्मद sss लेकाचा निपचित देह पाहून पित्याचा टाहो, क्षणात सगळं संपलं, वडिलही गेले
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement