जालन्यात MIM स्वबळावर, 17 उमेदवार रिंगणात, प्रस्थापित उमेदवारांना धास्ती

Last Updated:

जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएमने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

जालना एमआयएम उमेदवार
जालना एमआयएम उमेदवार
जालना : जालना महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम स्वबळावर रिंगणात उतरली आहे. एमआयएमने 17 उमेदवार उभे केलेत. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनाही पक्षाने नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलीय.
विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा तारा सितारा असा उल्लेख करत या दोन नेत्यांनी शहराच्या विकासाची वाट लावल्याचा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केलाय. लोकांच्या आशिर्वादाने या निवडणुकीत एमआयएमला चांगलं यश देखील मिळणार असल्याचा दावा शेख माजेद यांनी केला.

आम्ही त्यांची चौकशी लावू, एमआयएमचा भाजप सेनेला इशारा

advertisement
शहरातील नागरिक विकासाला प्राधान्य देतील अशी आशा आहे. राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार हे गुत्तेदारी करणारे असून ते लोकप्रतिनिधी राहिलेले नाहीत. गुत्तेदारीच्या माध्यमातून या नगरसेवकांनी प्रचंड भ्रष्टाचार केला असून यांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी लावू, असा अशारा देखील एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी दिला.

एमआयएमची काँग्रेसवर सडकून टीका

धर्मनिरपेक्ष विचार सांगणाऱ्या पक्षाला मुस्लीम समाजाची मते हवी आहेत. परंतु त्यांना मुस्लिमांना तिकीट द्यायचे नाही. आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांनी आम्हाला झटकून दिले, अशी खंत एमआयएमने व्यक्त केली. तसेच आम्ही कोणत्याही जागांसाठी अडून बसणारे नव्हतो. अमुक जागाच हव्यात, अशीही आमची मागणी नव्हती. मात्र त्यांना आम्हाला प्रतिनिधित्वच द्यायचे नव्हते, असा आरोप जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केला.
advertisement

एमआयएमचे कुठे कुठे उमेदवार?

एमआयएमने उमेदवाकी यादीत प्रभाग क्रमांक ११ मधून तीन उमेदवार, प्रभाग क्रमांक ४ मधून दोन उमेदवार, प्रभाग क्रमांक १० मधून दोन उमेदवार तर प्रभाग क्रमांक १५ मधून एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जालन्यात MIM स्वबळावर, 17 उमेदवार रिंगणात, प्रस्थापित उमेदवारांना धास्ती
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement