Jalna News: अपघाताचा गुन्हा नोंदवण्यासाठी मागितले पैसे, लाचखोर महिला हवालदार ACB जाळ्यात
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna News: एका अपघातात गुन्हा नोंदवून पंचनामा करण्यासाठी महिला हवालदाराने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. पाच हजार रुपये घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
जालना: गुन्हा नोंदवून घेण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जालन्यातील चंदनझिरा पोलीस स्थानकात या महिला हवालदारावर सापळा रचून कारवाई करण्यात आली. सिंधू नानासाहेब खरजुले असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. एका अपघातात गुन्हा नोंदवून पंचनामा करण्यासाठी महिला हवालदाराने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती.
सिंधू खरजुले ही जालन्यातील चंदनझिरा पोलीस स्थानकात हवालदार म्हणून कार्यरत आहे. समर्थनगर परिसरात राहणाऱ्या खरजुले यांना 70 हजारांवर पगार आहे. तरीही एका मोटारसायकल अपघातात गुन्हा नोंदवून घेण्यासाठी तिने 10 हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. तक्रारीवर पडताळणी केल्यानंतर जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
advertisement
नेमकं घडलं काय?
तक्रारदाराचे दाजी आणि भाचा मोटारसायकल अपघातात जखमी झाले. भाच्याच्या डोक्याला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला आधी सरकारी रुग्णालयात, नंतर कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तो सध्या उपचार घेत आहे. तक्रारदाराने चंदनझिरा पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार देण्यासाठी गेल्यावर सिंधू खरजुले हिने 10 हजारांची मागणी केली. तडजोडीत 5 हजार रुपये घेण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली.
advertisement
दरम्यान, एसीबीने सापळा रचून खरजुले हिला 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Oct 07, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna News: अपघाताचा गुन्हा नोंदवण्यासाठी मागितले पैसे, लाचखोर महिला हवालदार ACB जाळ्यात











