Jalna Tirupati Train: जालना ते तिरुपती पुन्हा धावणार स्पेशल ट्रेन, वेळापत्रक आणि थांबे संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Jalna Tirupati Train: मराठवाड्यातील भाविकांना 3 दिवसांत तिरुपती दर्शन घेऊन परतता येणार आहे. जालना ते तिरुपती विशेष रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आलीये.
जालना: मराठवाड्यातून तिरुपती दर्शनासाठी आता थेट रेल्वेने जाता येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने जालना-तिरुपती विशेष गाडी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही साप्ताहिक गाडी 7 जुलै 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत सोडण्यात येणार असून दर सोमवारी जालन्यातून निघेल आणि मंगळवारी तिरुपती येथे पोहोचणार आहे.
विशेष रेल्वेचे वेळापत्रक
जालना-तिरुपती या रेल्वेमध्ये सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील. दर सोमवारी सकाळी 7 वाजता ही गाडी जालना येथून निघून मंगळवारी सकाळी 10.45 वाजता तिरुपतीला पोहोचेल. तर तिरुपती येथून मंगळवारी दुपारी 3.15 वाजता निघून बुधवारी दुपारी 3.50 वाजता जालन्यात पोहोचेल. त्यामुळे तिरुपती भक्तांना 3 दिवसांत तिरुपती दर्शन घडणार आहे.
advertisement
हे असतील थांबे
जालना ते तिरुपती (07609) ही विशेष रेल्वे परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, विकाराबाद, लिंगमपल्ली, गुटूर गुडूर, रेनीगुंटामार्गे धावेल. तर तिरुपती ते जालना (07610) ही विशेष रेल्वे रेनीगुंटा, गुडूर गुंटूर, लिंगमपल्ली, विकाराबाद, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूरमार्गे धावणार आहे. 7 जुलै 2025 ते 30 मार्च 2026 दरम्यान ही गाडी धावणार आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
June 18, 2025 12:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna Tirupati Train: जालना ते तिरुपती पुन्हा धावणार स्पेशल ट्रेन, वेळापत्रक आणि थांबे संपूर्ण माहिती