Jalna News : जालन्यात या वर्षी झाला तुफान पाऊस, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मागील काही दिवसांपासून राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय. यामुळे धरणातील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
जालना: मागील काही दिवसांपासून राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय. यामुळे धरणातील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जालना जिल्ह्यातील मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झाला यामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला आहे. लोकल 18 ने जालना जिल्ह्यातील पाण्याच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा.
जालना जिल्ह्यामध्ये एकूण 67 लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत. साठ लघु प्रकल्प तर सात मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये सरासरी 69.53 टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध झाला आहे. सात मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याची सरासरी 81 टक्क्यांच्या आसपास आहे तर 60 लघु प्रकल्पातील पाणीसाठ्याची सरासरी ही 63 टक्के एवढी आहे.
advertisement
सात मध्यम प्रकल्पांपैकी कल्याण गिरीजा, अप्पर दुधना, जीवरेखा आणि गल्लाटी हे चार मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले असून ते ओव्हर फ्लो झाले आहेत. तर कल्याण मध्यम प्रकल्पात 64.65 टक्के जुई मध्यम प्रकल्प 90.55 टक्के आणि धामणा मध्यम प्रकल्पामध्ये 43.28 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
advertisement
साठ लघु प्रकल्पांपैकी 44 लघु प्रकल्प हे 75 टक्के ते शंभर टक्क्यांच्या दरम्यान भरले आहेत. तर जोता पातळीखाली एकूण पाच प्रकल्प आहेत. 25 पेक्षा कमी पाणीसाठा असलेले दोन प्रकल्प आहेत. 25 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान तीन प्रकल्प तर 50 टक्के ते 75 टक्के पाणीसाठा असलेले सहा प्रकल्प आहेत, अशी माहिती जालना लघुपाटबंधारे विभाग येथील अनुरेखक शुभांगी घुर्डे यांनी दिली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 18, 2025 10:10 PM IST
मराठी बातम्या/जालना/
Jalna News : जालन्यात या वर्षी झाला तुफान पाऊस, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?