हजारो हेक्टर शेती पाण्यात वाहून गेली, सोलापुरात पावसाचा हाहाकार; शेतीची बिकट अवस्था

Last Updated:

Solapur Heavy Rains : सोलापूर जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या सुरू असलेल्या या पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान होत आहे.

+
सोलापुरात

सोलापुरात पावसाचा हाहाकार, सोयाबीन, उडीद आणि कांदा पावसाच्या पाण्यात गेला वाहून<

सोलापूर जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या सुरू असलेल्या या पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. रेवण महादेव शिंदे यांनी पाच एकरामध्ये एक एकर उडीद, एक एकर सोयाबीन आणि तीन एकर मध्ये कांद्याची लागवड केली होती. परंतु या सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावातील अपंग शेतकरी रेवण महादेव शिंदे यांनी एक एकर उडीद, एक एकर सोयाबीन तर तीन एकर कांद्याची लागवड केली होती. परंतु मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि उडीद पिकाची लागवड करण्यासाठी शेतकरी रेवण शिंदे यांना दीड लाख रुपयापर्यंत खर्च आला.तर कांद्या लागवडीसाठी दीड ते दोन लाख रुपये पर्यंत खर्च आला होता.
advertisement
शेतीचे एवढे नुकसान झाले असूनही आतापर्यंत कोणत्याही विमा कंपनीने किंवा कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शेतात येऊन आतापर्यंत पिकाचे पंचनामे देखील केलेले नाही. मध्यंतरी पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती तेव्हा शिंदे यांनी सोयाबीन, उडीद आणि कांद्याची लागवड केली होती. लागवड केल्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कांद्याची लागवड केल्यावर जोरदार पावसाला सुरुवात झाली लावलेला कांदा संपूर्ण पाण्यात वाहून गेला. एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसताना देखील सरकार मुक्याचा सोंग घेऊन बसतो. तर दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना बहिऱ्याचा सोंग घेऊन बसतो. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी अर्थहात अपंग बळीराजा रेवण शिंदे यांनी केली आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हजारो हेक्टर शेती पाण्यात वाहून गेली, सोलापुरात पावसाचा हाहाकार; शेतीची बिकट अवस्था
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement