advertisement

Maharashtra Rain Update : संपूर्ण मे महिन्यात पाऊस, 50 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, कारण काय? Video

Last Updated:

मे महिन्यामध्ये उन्हाळा साधारणपणे त्याच्या पीक पोझिशनवर असतो. मात्र यंदा वेगळी परिस्थिती पाहायला मिळतीये. 4 मे पासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये सलग 20 दिवसांपासून पाऊस पडत आहे.

+
Pune

Pune rain: पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत पुढचे 24 तास धोक्याचे, हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रासाठी दिला महत्त्वाचा अलर्ट

जालना : मे महिन्यामध्ये उन्हाळा साधारणपणे त्याच्या पीक पोझिशनवर असतो. मात्र यंदा वेगळी परिस्थिती पाहायला मिळतीये. 4 मे पासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये सलग 20 दिवसांपासून पाऊस पडत आहे. हा पॅटर्न का निर्माण झाला हे जाणून घेण्यासाठी लोकल 18 च्या प्रतिनिधीने जालना विज्ञान केंद्र खरपुडी येथील हवामान तज्ज्ञ पंडित वासरे यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
यावर्षी जर आपण पाहिलं तर 4 मे पासूनच राज्यात सलग पाऊस सुरू आहेतसं पाहिलं तर मे महिना हा कडक उन्हाचा असतोजालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तब्बल 125 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील 22 दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसाचं कारण शोधायला गेल्यास भारताच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या अरबी आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये सातत्याने तयार होत असलेली कमी दाबाची क्षेत्रे आणि त्यामुळे निर्माण होत असलेली दोन्ही स्थिती पावसाला अनुकूल ठरत आहे. यामुळेच राज्यभरात मागील 20 ते 22 दिवसांपासून पाऊस होत असल्याचं हवामान तज्ज्ञ पंडित वासरे यांनी बोलताना सांगितलं.
advertisement
मान्सून देखील यावर्षी महाराष्ट्रात मे महिन्यातच दाखल झाला आहे. याआधी 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यानंतर यंदा 24 मे रोजी तो केरळात दाखल झालाय. याला देखील वरील परिस्थितीत कारणीभूत ठरली असून यामुळे मान्सून लवकर दाखल झाला आहे. आयएमडीने देखील यंदा 104 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहेपेरणी योग्य पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 5 जून पर्यंत शेतकऱ्यांनी धीर धरावा यानंतरच पेरणीची तयारी करावी, असं आवाहन कृषी तज्ज्ञ आणि हवामान अभ्यासक पंडित वासरे यांनी केले आहे
advertisement
देशात लवकर पोहोचलेल्या मान्सून आणि संपूर्ण मे महिन्यात झालेला पाऊस या परिस्थितीत बरोबर आकलन करता येणे थोडे  अवघड आहे. परंतु या बाबीला जागतिक हवामान बदलाशी आपण जोडू शकतो, असे देखील त्यांनी लोकल 18 शी बोलताना स्पष्ट केलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Maharashtra Rain Update : संपूर्ण मे महिन्यात पाऊस, 50 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, कारण काय? Video
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement