Phaltan Doctor Death: प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नाही, IG सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची खरडपट्टी

Last Updated:

Kolhapur IG Sunil Fulari: कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सातारा पोलिसांची झाडाझडती घेतली.

सुनील फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक)
सुनील फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक)
सातारा : साताऱ्यातील फलटण पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्याने राज्यासह देशाभरात चर्चा होत आहे. पोलीस उपनिरीक्षकावरच जर अत्याचाराचे आरोप होत असतील तर सर्वसामान्यांनी कुठे जायचे? असा प्रश्न विचारला जात आहे. कुंपनानेच शेत खायचे म्हटल्यावर सामान्य माणसाला कुणी वाली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर खाकीवर गंभीर आरोप झाल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सातारा पोलिसांना सुनावले.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बीडच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा कारणीभूत असल्याचे खुद्द पीडितीने स्वत:च्या हातावर लिहिले. गोपाळ बदने याने वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोपही पीडितेने चिठ्ठीतून केला. या सगळ्याचा तपास पोलीस करीत असून फलटण पोलीस स्टेशनला कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शनिवारी भेट दिली.
advertisement

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी फलटणमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण शहर पोलीस ठाण्याचे रविवारी सकाळी उद्घाटन होणार असून तयारीचा आढावा घेण्याकरिता सुनील फुलारी फलटणला आले आहेत. तसेच डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याकडून सुनील फुलारी यांनी माहिती घेतली. यावेळी डॉक्टर आत्महत्या प्रकरण पोलिसांनी योग्य पद्धतीने हाताळले नाही अशा शब्दात फुलारी यांनी पोलिसांना सुनावले.
advertisement

खाकीवर गंभीर आरोप झाल्याने सुनील फुलारी यांनी पोलिसांना सुनावले

खाकीवर गंभीर आरोप झाल्याने सुनील फुलारी यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही हे प्रकरण अजिबात नीट हाताळले नाही. अशा घटना जर व्हायला लागल्या तर खाकीवरचा विश्वास उडून जाईल, असे फुलारी म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Phaltan Doctor Death: प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नाही, IG सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची खरडपट्टी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement