advertisement

'हॅलो, रात्री भेटायला ये', डेटींग ॲपवरून तरुणांना बोलवायचे, भेटायला येताच घडायचं भयंकर, पुण्यातील टोळी अटकेत!

Last Updated:

सोशल मीडिया आणि डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करायची आणि त्यांना एकांतात भेटायला बोलावून लुटणाऱ्या एका टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: सोशल मीडिया आणि डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करायची आणि त्यांना एकांतात भेटायला बोलावून लुटणाऱ्या एका टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून लूटमार केलेले दागिने, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली आहेत.

नेमकं जाळ्यात कसं फसवायचे?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी डेटिंग अ‍ॅपवर बनावट प्रोफाईल तयार करून किंवा ओळख वाढवून तरुणांना जाळ्यात ओढायचे. ११ जानेवारी रोजी या टोळीने एका तरुणाला रात्रीच्या वेळी भेटायला बोलावलं होतं. तरुण घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्याला घेरले आणि कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी तरुणाजवळील सोन्याचे दागिने आणि महागडा मोबाईल हिसकावून घेतला. इतकेच नव्हे, तर त्याला जबरदस्तीने एटीएममध्ये नेऊन रोख रक्कम काढायला लावून तीदेखील लुटली.
advertisement

पाच आरोपींच्या आवळल्या मुसक्या

कोंढवा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहिल अकील शेख (वय १९, रा. कोंढवा), नुहान नईम शेख (वय १८, रा. कोंढवा), शाहिद शाहनूर मोमीन (वय २५, रा. कात्रज), इशान निसार शेख (वय २५, रा. कात्रज) आणि वाहिद दस्तगीर शेख (वय १८, रा. कोंढवा) अशा पाच जणांचा समावेश आहे.
advertisement

आणखी दोन गुन्हे उघडकीस

पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीने अशाच प्रकारे पुण्यात आणखी दोन ठिकाणी गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. आरोपींकडून तीन मोबाईल, एक कोयता आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीने आणखी किती जणांना लुटले आहे, याचा तपास पोलीस करत असून त्या अनुषंगाने स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'हॅलो, रात्री भेटायला ये', डेटींग ॲपवरून तरुणांना बोलवायचे, भेटायला येताच घडायचं भयंकर, पुण्यातील टोळी अटकेत!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement