Ration Card: 250000 लोकांना मिळणार नाही रेशनचं धान्य? प्रशासनाने दिला कडक इशारा, तुमचं नाव तर नाही?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गोंदियात रेशन कार्ड धारकांची ई-केवायसीसाठी धावपळ, वेळेत काम न केल्यास नाव कापलं जाणार!
गोंदिया: शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात अद्यापही २ लाख ३७ हजार लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जर वेळेत ई-केवायसी केली नाही, तर अशा लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत मिळणारे स्वस्त धान्य कायमचे बंद होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
जे लाभार्थी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांची नावे रेशन कार्डमधून कायमची हटवली जाऊ शकतात किंवा त्यांचे रेशन वितरण तातडीने बंद केले जाऊ शकते. जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ लाख १३ हजार लाभार्थ्यांनी यशस्वीपणे ई-केवायसी पूर्ण केली आहे. २ लाख ३७ हजार लाभार्थी अद्यापही प्रलंबित आहेत.
advertisement
शासनाने सर्वांना संधी मिळावी यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे, जेणेकरून कोणीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये. ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप e-KYC केलेले नाही, त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यातील तांत्रिक अडचणी आणि धान्याचा पुरवठा खंडित होणार नाही.
advertisement









