advertisement

धमकी, छळ आणि अमानुष मारहाण! चारित्र्याच्या संशयावरून पुण्यात विवाहितेला 'नरकवास'; शेवटी गाठला क्रूरतेचा कळस

Last Updated:

आरोपी पती हितेश याने भाग्यश्री यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना वारंवार चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर सोन्याची अंगठी आणि चांदीच्या भांड्यांची मागणी करत त्यांचा छळ करण्यात आला.

पुण्यात विवाहितेचा छळ (AI Image)
पुण्यात विवाहितेचा छळ (AI Image)
पुणे : पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील एका विवाहितेसोबत अजब प्रकार घडला. चारित्र्याच्या संशयावरून आणि हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून पीडित महिलेने सासवड पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पोलिसांनी पतीसह सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
भाग्यश्री हितेश पारगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जून २०२४ पासून मे २०२५ अखेरपर्यंत त्यांचा छळ करण्यात आला. पती हितेश शिवाजी पारगे, सासू इंदुमती पारगे (रा. डोणजे, हवेली) आणि नणंद सिद्धी गणेश गोसावी (रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी संगनमत करून भाग्यश्री यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. लग्नात अपेक्षित मानपान मिळाला नाही, या कारणावरून ही मारहाण केली जात होती.
advertisement
अमानुष मारहाण आणि धमक्या: आरोपी पती हितेश याने भाग्यश्री यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना वारंवार चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर सोन्याची अंगठी आणि चांदीच्या भांड्यांची मागणी करत त्यांचा छळ करण्यात आला. विरोध केल्यास माहेरच्या मंडळींना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या त्रासादरम्यान आरोपींनी भाग्यश्री यांचे मंगळसूत्र आणि मोबाईल हिसकावून घेत त्यांना गंभीर दुखापत केली.
advertisement
सततच्या या छळाला कंटाळून भाग्यश्री यांनी अखेर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून सासवड पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
धमकी, छळ आणि अमानुष मारहाण! चारित्र्याच्या संशयावरून पुण्यात विवाहितेला 'नरकवास'; शेवटी गाठला क्रूरतेचा कळस
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement