advertisement

Mumbai : 11कोटींची चूक! शेअर मार्केटची अचूक टीप, पण नफा दिसला अन् तिथंच फसला, व्यापाऱ्यासोबत काय घडलं?

Last Updated:

Whatsapp Investment Fraud : दक्षिण मुंबईतील एका व्यावसायिकाची व्हॉट्सअॅपवरील शेअर बाजार गुंतवणूक स्कॅममधून 11 कोटी रुपयांची फसवणूक झाली. बनावट अॅपद्वारे पैसे गुंतवायला लावून सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला.

News18
News18
मुंबई : दक्षिण मुंबईतील एका नामांकित व्यावसायिकाची तब्बल 11 कोटी रुपयांची ऑनलाइन शेअर बाजार फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे योग्य मार्गदर्शन मिळेल या विश्वासावरून संबंधित व्यावसायिकाला व्हॉट्सअॅपवरील एका ग्रुपमध्ये सामावून घेण्यात आले होते.
एका 'क्लिक'वर 11 कोटी गायब
चर्चगेट परिसरात राहणाऱ्या या व्यावसायिकाची लॉजिस्टिक कंपनी आहे. निवांत वेळेत शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी हे शिकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी इंटरनेटवर माहिती शोधली असता विविध वेबसाइट्स आणि हेल्पलाइन दिसल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर शेअर बाजारातील ऑनलाइन मार्गदर्शनाबाबत संदेश आला.
व्यावसायिकाने होकार दिल्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. या ग्रुपमध्ये अॅडमिन आणि इतर सदस्य शेअर बाजारातील टिप्स देत होते. बाजारातील अपडेट्स अचूक वाटत असल्याने व्यावसायिकाचा विश्वास बसला. त्यानंतर अॅडमिनने एक लिंक पाठवून अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अॅपमध्ये वॉलेट अकाऊंट तयार करून युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला.
advertisement
अखेर सायबर पोलिसांत तक्रार दाखल
ग्रुपमधून मिळणाऱ्या सल्ल्यानुसार व्यावसायिकाने अॅपद्वारे गुंतवणूक सुरू केली. सुरुवातीला नफा दिसत असल्याने त्यांनी हळूहळू तब्बल 11 कोटी रुपये गुंतवले. मात्र काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यावर पैसे मिळाले नाहीत. संपर्क साधल्यावर अॅडमिनने दंड म्हणून आणखी आठ कोटी रुपये भरण्याची मागणी केली. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : 11कोटींची चूक! शेअर मार्केटची अचूक टीप, पण नफा दिसला अन् तिथंच फसला, व्यापाऱ्यासोबत काय घडलं?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement