advertisement

Pune Crime: ते आले, त्यांनी पाहिलं अन्...; सोमवार पेठेत भरदिवसा घरात घुसून धक्कादायक कांड, महिला हादरली

Last Updated:

सोमवार पेठेतील एका सोसायटीत राहणाऱ्या महिला मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आपल्या फ्लॅटला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.

महिलेच्या घरी भरदिवसा चोरी (AI Image)
महिलेच्या घरी भरदिवसा चोरी (AI Image)
पुणे : पुणे शहरातील गजबजलेल्या सोमवार पेठ परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची एक धाडसी घटना घडली आहे. खडीचे मैदान जवळील एका सोसायटीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ३ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
सोमवार पेठेतील एका सोसायटीत राहणाऱ्या महिला मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आपल्या फ्लॅटला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. भरवस्तीत घर असल्याने आणि वर्दळ असल्याने त्यांना चोरीची शंकाही आली नाही. मात्र, दुपारी पाऊणे तीन वाजता त्या घरी परतल्या असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले.
advertisement
लाखोंचा ऐवज लंपास: घरात प्रवेश केल्यावर चोरट्यांनी कपाट फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख १२ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी अवघ्या साडेतीन तासांच्या कालावधीत लंपास केला होता. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे सोसायटीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने तात्काळ समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी सुरू केली आहे. गजबजलेल्या भागात आणि ते ही दिवसा झालेल्या या घरफोडीमुळे पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
advertisement
दुचाकीवरील तरुणाला लुटलं
पुणे शहरातील फुरसुंगी भागातही चेन स्नॅचिंगची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून, चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील १ लाख २२ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: ते आले, त्यांनी पाहिलं अन्...; सोमवार पेठेत भरदिवसा घरात घुसून धक्कादायक कांड, महिला हादरली
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement