Pune Train: रेल्वे प्रवाशांचे हाल! दौंड मार्गावर 2 दिवसांचा ब्लॉक; या 26 एक्स्प्रेससह 38 गाड्या रद्द
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या दौड-काष्टी स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे आणि नॉन-इंटरलोकिंगचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या ब्लॉकमुळे एकूण २६ एक्स्प्रेस आणि १२ डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
पुणे : पुणे रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या दौड-काष्टी स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे आणि नॉन-इंटरलोकिंगचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून २४ आणि २५ जानेवारी असे दोन दिवस 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुणे-सोलापूर आणि पुणे-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या: दोन दिवसांच्या या ब्लॉकमुळे एकूण २६ एक्स्प्रेस आणि १२ डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुणे-नागपूर (गरीबरथसह), पुणे-अमरावती, पुणे-सोलापूर (हुतात्मा व इंटरसिटी), पुणे-अजनी, पुणे-नांदेड, पुणे-हरंगुळ आणि दौंड-निजामुद्दीन या दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच पनवेल-नांदेड एक्स्प्रेस आणि हडपसर-सोलापूर डेमू या गाड्याही पूर्णपणे रद्द राहतील.
advertisement
मार्ग बदल आणि उशिराने धावणाऱ्या गाड्या: काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामध्ये यशवंतपूर-चंदीगड, तिरुअनंतपुरम-मुंबई आणि हुबळी-निजामुद्दीन या गाड्या लोणावळा-कल्याण-मनमाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. तसेच सातारा-दादर एक्स्प्रेस ही गाडी सातारा-जेजुरी-पुणे मार्गे चालवली जाईल. जम्मूतवी-पुणे एक्स्प्रेसदेखील बदललेल्या मार्गाने धावणार आहे.
advertisement
याव्यतिरिक्त, काही महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून त्या उशिराने सुटणार आहेत. यामध्ये पुणे-हावडा एक्स्प्रेस ४ तास, पुणे-जम्मूतवी २ तास, कुर्ला-विशाखापट्टणम २ तास आणि पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस १ तास उशिराने मार्गस्थ होतील. रेल्वे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 8:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Train: रेल्वे प्रवाशांचे हाल! दौंड मार्गावर 2 दिवसांचा ब्लॉक; या 26 एक्स्प्रेससह 38 गाड्या रद्द









