advertisement

Latur ZP Election Results : उदगीरच्या 7 गटांमध्ये कुणाची बाजी? विजयी उमेदवारांची लिस्ट

Last Updated:

लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. लातूरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख तसंच भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

उदगीरच्या 7 गटांमध्ये कुणाची बाजी? विजयी उमेदवारांची लिस्ट
उदगीरच्या 7 गटांमध्ये कुणाची बाजी? विजयी उमेदवारांची लिस्ट
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. लातूरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख तसंच भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याआधी 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजप 36 जागांवर जिंकली होती, त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली होती. उदगीर तालुक्यातील 7 गटांमध्ये बहुतेक ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

उदगीरच्या 7 गटांमधील उमेदवार

वाढवणा बु.: येथे चिमनदरे नागोराव (काँग्रेस), तिरुके रामचंद्र (भाजप) आणि शेळके शंकर (शिंदेसेना) यांच्यात प्रमुख लढत आहे.
सोमनाथपूर आणि नळगीर: या दोन्ही गटांत महिला उमेदवारांचे वर्चस्व असून, येथे काँग्रेस, भाजप आणि शिंदेसेना यांच्यात तिरंगी सामना आहे.
निडेबन: काँग्रेसचे रंजित पाटील, अपक्ष दीपक सोमवंशी आणि शिंदेसेनेचे नृसिंग जाधव रिंगणात आहेत.
advertisement
लोहारा: येथे मुकेश भालेराव (काँग्रेस), विजयकुमार कांबळे (भाजप) आणि गणेश कांबळे (शिंदेसेना) उमेदवार आहेत.
हेर आणि तोगरी: या गटांत भाजपने थेट उमेदवार दिलेला नसून, येथे काँग्रेस, अपक्ष आणि शिंदेसेना यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Election Results : उदगीरच्या 7 गटांमध्ये कुणाची बाजी? विजयी उमेदवारांची लिस्ट
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement