Latur News : शेततळ्यात आली महाकाय मगर! 200 किलो वजन अन् 8 फूट लांब; वनखात्याच्या नाकी नऊ, Video
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Latur News : निलंगा तालुक्यात एका शेततळ्यात महाकाय मगर आढळल्याने खळबळ उडाली होती.
लातूर, (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षात निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. परिणामी वन्यजीव आणि मानवी संघर्ष आता रोजचाच झालाय. बिबट्याचा हल्ला तर आता सामान्य बाब झाली आहे. परंतू आता काही अनपेक्षित घटनाही समोर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीत एका मासेमारीसाठी गेलेल्या एका तरुणावर शार्कने हल्ला केला. ही घटना ताजी असताना आता लातूर जिल्ह्यात एका शेततळ्यात महाकाय मगर आढळल्याने खळबळ उडाली आहे.
शेततळ्यात आढळली महाकाय मगर?
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा शहरातील संजय हलगरकर यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये मगर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सेजाळ यांनी घटनास्थळी जाऊन मगर असल्याची खात्री केली आणि वनविभागाला कळविले. वनविभागाचे वनरक्षक बडगीरे यानी तालुक्यातील राठोडा लांबोटा येथील सर्पमित्र, प्राणीमित्रांना तात्काळ बोलावून घेऊन हलगरकर यांच्या शेतात असलेल्या मगरीला पकडण्यासाठी जवळपास तीन तास जिकरीचे प्रयत्न करावे लागले. सदरील शेततळ्याच्या बाजूला लागूनच वस्ती असल्यामुळे नागरीकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच अचानक मगर आल्याने काही काळ शहरात भितीचे वातावरण पसरले होते. गावातील काही नागरिकांनी तर आपली घराची दारे बंद करून घेतले होते. त्यानंतर दोनशे किलो वजन आणि आठ फुट लांब असलेल्या या महाकाय मगरीला 14 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तरूणांच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद करून वनविभाने घेऊन गेल्यानंतर शहरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
advertisement
शेततळ्यात आली महाकाय मगर, स्थानिकांची घाबरगुंडी pic.twitter.com/vbkZojTWS7
— News18Lokmat (@News18lokmat) February 17, 2024
पथकाने दोन तास पाण्यात निरीक्षण केल्यानंतर शेततळ्यात मगर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजेपासून सायंकाळी सातपर्यंत शेततळ्यातील पाण्याचा उपसा सुरू केला, त्यावेळी मगर आढळली. रात्री आठपासून अकरा वाजेपर्यंतच्या प्रयत्नानंतर मगर पकडण्यात यश आले.
advertisement
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Feb 17, 2024 6:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : शेततळ्यात आली महाकाय मगर! 200 किलो वजन अन् 8 फूट लांब; वनखात्याच्या नाकी नऊ, Video




