'जगदगुरु संत नरेंद्राचार्य महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा', नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
- Published by:Sachin S
- Reported by:Tushar Rupnavar
Last Updated:
“राज्यातील अनेक महान संतांनी महाराष्ट्राला दिशा दिली आहे. त्याच परंपरेत नरेंद्राचार्य महाराज यांनी कार्य केले असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य...
मुंबई: भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज एक महत्त्वपूर्ण मागणी केली. 'जगदगुरु संत नरेंद्राचार्य महाराज यांना त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.
संत नरेंद्राचार्य महाराज यांनी ग्रामीण भागातील शिक्षण प्रसार, गरीब आणि वंचित घटकांसाठी आरोग्य शिबिरं, पर्यावरण संवर्धन, तसेच अध्यात्मिक मार्गदर्शन या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा समाजाशी असलेला जवळचा संबंध आणि प्रत्येक घटकाला दिलेला आधार ही त्यांची ओळख आहे. त्यामुळे “संत नरेंद्राचार्य महाराज हे केवळ आध्यात्मिक गुरू नसून समाजजीवनाला दिशा देणारे संत आहेत. त्यांनी धर्मप्रसार, सांस्कृतिक वारसा जतन, तसंच समाजासाठी केलेल्या कार्यामुळे ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण आहेत” असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.
advertisement
नितेश राणे यांनी पुढे सांगितले की, “राज्यातील अनेक महान संतांनी महाराष्ट्राला दिशा दिली आहे. त्याच परंपरेत नरेंद्राचार्य महाराज यांनी कार्य केले असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य लोकांना जीवनाचा योग्य मार्ग मिळाला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करावा, ही आमची मागणी आहे.”
'महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान असून तो समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. संत नरेंद्राचार्य महाराज यांच्या कार्याचा व्याप्ती आणि समाजावरचा प्रभाव पाहता, त्यांना हा सन्मान मिळणे योग्य ठरेल. या मागणीमुळे राज्यातील धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आणि भक्तांनीही ही मागणी पुढे नेण्याची तयारी दर्शवली आहे. यापूर्वी देखील अनेक जणांनी नरेंद्राचार्य यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा ही मागणी करण्यात आली होती, आता थेट मंत्री नितेश राणे यांनी ही मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 5:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'जगदगुरु संत नरेंद्राचार्य महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा', नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी