advertisement

उमेदवारांनो, हे चुकवू नका! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी महत्त्वाच्या तारखा

Last Updated:

पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर दुसऱ्या दिवशीच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

News18
News18
मुंबई: महाराष्ट्रात अखेर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर दुसऱ्या दिवशीच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा तारखा जाहीर केल्या आहे.
अर्ज कधीपर्यंत भरायचा? 
10 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात
17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार
अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर 2025
अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर 2025
अपिल असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर 2025
निवडणूक चिन्ह 26 नोव्हेंबर 2025
advertisement
मतदान - 2 डिसेंबर 2025
मतमोजणी - 3 डिसेंबर 2025
राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उमेदवारांनो, हे चुकवू नका! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी महत्त्वाच्या तारखा
Next Article
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement