सिंधुदुर्ग ZP-PS निकाल 2026 LIVE | सिंधुदुर्गात निकाल फिरला! इतक्या अपक्षांनी मारली बाजी, वाचा निकालाचे अपडेट्स
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sindhudurga ZP Election 2026 : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारण तापले असून यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार ठरली.
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हाभरात सरासरी ६१.९८ टक्के मतदान नोंदवले गेले असून ग्रामीण भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर उपस्थिती लावली होती. सध्याच्या निकालानुसार भाजप आघाडीवर आहे.
निकालाचे ताजे अपडेट्स
सावंतवाडी तालुक्यात अपक्षांची बाजी मारली आहे. सावंतवाडी धक्कादायक निकाल समोर आला आहे. माडखोल जिल्हा परिषद सह दोन्ही पंचायत समितीवर अपक्षांनी मारली बाजी आहे.
शिवानी नाईक- माडखोल जि.प.
अवनी राऊळ- माडखोल पंचायत समिती
प्रथमेश सावंत- कलंबिस्त पंचायत समिती
जिल्हा परिषद बिनविरोध उमेदवार
१) खारेपाटण जिल्हा परिषद प्राची इस्वालकर (भाजप)
२)बांदा जिल्हा परिषद प्रमोद कामत (भाजप)
advertisement
३)जाणवली जिल्हा परिषद रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
४)पडेल जिल्हा परिषद सुयोगी घाडी (भाजप)
५)बापर्डे जिल्हा परिषद अवनी तेली (भाजप)
६) पोंगुर्ले जिल्हा परिषद अनुराधा नारकर (भाजप)
७)किंजवडे जिल्हा परिषद सावी लोके (भाजप)
८) कोळपे जिल्हा परिषद प्रमोद रावराणे (भाजप)
सावंतवाडी आणि वेंगुर्ला आघाडीवर
जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सावंतवाडी तालुक्याने सर्वाधिक मतदानाचा मान पटकावला. येथे तब्बल ६९.५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडीपाठोपाठ वेंगुर्ला तालुक्यात ६९.०३ टक्के मतदानाची नोंद झाली. या दोन्ही तालुक्यांत मतदारांचा उत्साह दिवसभर कायम होता.
advertisement
वैभववाडीत मतदानाचा टक्का कमी
दुसरीकडे, वैभववाडी तालुक्यात मतदानाचा उत्साह तुलनेने कमी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. येथे केवळ ५४.७९ टक्के मतदान झाले, जे जिल्ह्यातील सर्वात कमी प्रमाण ठरले. स्थानिक पातळीवरील काही कारणांमुळे मतदारांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळाला नसल्याचे बोलले जात आहे.
तालुकानिहाय मतदानाची स्थिती
सावंतवाडी तालुक्यातील १ लाख ४ हजार मतदारांपैकी ७२,३१९ मतदारांनी मतदान केले.वेंगुर्ला तालुक्यात ५८,७८५ पैकी ४०,५७९ मतदारांनी कौल दिला.कुडाळ तालुक्यातील १,१६,६३० मतदारांपैकी ७०,०७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच ६०.०८ टक्के मतदान झाले.
advertisement
दोडामार्ग तालुक्यात ५९.८३ टक्के, तर कणकवलीत ५९.८१ टक्के मतदान नोंदवले गेले.मालवण तालुक्यात ५८.९० टक्के, तर देवगड तालुक्यात ५७.१२ टक्के मतदान झाले.
वैभववाडी तालुक्यात ३१,९९१ मतदारांपैकी १७,५२९ मतदारांनी मतदान केले.
एकूण मतदानाचा आढावा
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५,६१,१०५ मतदार असून त्यापैकी ३,४७,७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच मोठ्या लढती
नेरूळ - देऊळवाडा रुपेश पावसकर भाजप (बंडखोर) विरूद्ध संजय पडते (शिंदे शिवसेना) भाजपमधील अंतर्गत बंडखोरीमुळे ही लढत चुरशीची ठरली.
advertisement
कोलगाव- (महेश सारंग भाजप) भाजपचे अधिकृत उमेदवार विरूद्ध मायकल डिसोजा भाजप (बंडखोर) कोलगावमध्ये भाजप विरुद्ध भाजप बंडखोर असा सामना रंगणार रंगला.
आडेली- सुमेधा नाईक भाजप पुरस्कृत विरूद्ध विजय नाईक(ठाकरे सेना) ठाकरे सेना महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट संघर्ष.
माटणे- दीपक गवस (भाजप)अधिकृत उमेदवार विरूद्ध बाबुराव धुरी (ठाकरे सेना) विरूद्ध राजन म्हापसेकर(भाजप (बंडखोर) म्हापसेकर यांच्या बंडखोरीमुळे माटणे मतदारसंघात तिरंगी लढत
advertisement
तळवडे- रुपेश राऊळ(ठाकरे सेना) विरूद्ध संदीप गावडे (भाजप)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 7:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिंधुदुर्ग ZP-PS निकाल 2026 LIVE | सिंधुदुर्गात निकाल फिरला! इतक्या अपक्षांनी मारली बाजी, वाचा निकालाचे अपडेट्स








