Election Commission : निवडणूक आयोगाचा सर्व्हर बाहेरून ऑपरेट होतोय? 'सुषमा गुप्ता'चा उल्लेख करत जयंत पाटलांचे गंभीर आरोप!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MVA Leaders Meets Maharastra Election Commission : याद्या दुरूस्त करण्यासाठी आम्ही सुरूवात करू, असं आश्वासन देखील दिल्याचं निवडणूक आयोगाने दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
Jayant Patil On Election Commission : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आवाज उठवला असून राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीचा तपशील मांडला. राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळाने भेट घेतली अन् आपली मागणी मांडली. अशातच बैठकीत काय काय झालं? यावर जयंत पाटील यांनी मोठं भाष्य केलं.
निवडणूक आयोगाकडून आश्वासन
आम्ही काल मुख्य निवडणूक अधिकारी यांना भेटून आम्ही त्यांना मतदार यांद्यांमधल्या अनंत चुका दाखविल्या. याद्या दुरूस्त करण्यासाठी आम्ही सुरूवात करू असं आश्वासन देखील दिल्याचं निवडणूक आयोगाने दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. काही मुद्दे हे राज्य निवडणूक आयोगाकडे येत होते म्हणून आज सामुहीकरित्या त्यांच्या पुढे आलो. आम्ही त्यांना पुरावे दिले. अपुरे पत्ते, चुकीचे पत्ते, मतदार यादीत ज्यांचे नाव आहे ते तिथे राहत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
advertisement
सुषमा गुप्ता महिलाच्या नावावर विविध इपिक नंबर
अनेक मतदार यादीमध्ये चुकीची माहिती देण्यात आली आहे. काहीचं नावच नाही. तर काही व्यक्तींना दुबार मतदानाची सिस्टिम आहे. इपिक नंबर एकच असतो, अशी आजपर्यंत समज होती. नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता या महिलाचं नाव विविध इपिक नंबरसह आहे. सहा वेळा नाव नोंदवलं आहे. 12 ऑगस्टला विविध चॅनेल्सने या माध्यमांमध्ये हे दाखवलं. दुपारी तीन वाजता आपण वस्तुस्थिती दाखवली आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता मतदार यादीतून सुषमा गुप्ता या महिलाचं नाव काढून टाकण्यात आली. दुपारी तीन वाजता आपण पुरावे दिले अन् सहाला ती नाव जातात. त्यामुळे आमचा प्रश्न आहे की, ही नावं कुणी काढली? असा सवाल आम्ही निवडणूक आयोगाला विचारला आहे.
advertisement
सर्व्हर कुणीतरी बाहेरून ऑपरेट करतंय
आमचा दावा असा आहे की, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी बाहेरून ऑपरेट करतंय. कुणीतरी बाहेरून सर्व्हर चालवत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी पाचनंतर मतदान किती झालं? यावर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यामध्ये काय घोळ आहे? असा सवाल जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 1:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Election Commission : निवडणूक आयोगाचा सर्व्हर बाहेरून ऑपरेट होतोय? 'सुषमा गुप्ता'चा उल्लेख करत जयंत पाटलांचे गंभीर आरोप!