वंदे भारत ते जनशताब्दी एक्स्प्रेस, 1 जानेवारीपासून रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल, संभाजीनगरहून कोणती ट्रेन कधी धावणार?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Railway Update: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण मध्य रेल्वेने सर्व प्रमुख गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीपासून दक्षिण मध्य रेल्वेचे सुधारित रेल्वे वेळापत्रक लागू होणार आहे. या नव्या वेळापत्रकानुसार काही प्रमुख रेल्वेगाड्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये जनशताब्दी एक्स्प्रेस तसेच हिंगोली–मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस यांसह इतर काही रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. वेळेत झालेल्या या बदलांचा थेट परिणाम प्रवाशांच्या प्रवासावर होणार असल्याने प्रवाशांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
प्रवासास निघण्यापूर्वी प्रवाशांनी भारतीय रेल्वेची चौकशी प्रणाली, अधिकृत रेल्वे संकेतस्थळ, स्टेशनवरील चौकशी कक्ष किंवा स्टेशन मास्टर यांच्याकडून अद्ययावत वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी, असे दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. विशेषतः 1 जानेवारी किंवा त्यानंतरची तिकीट आरक्षणे केलेल्या प्रवाशांनी संबंधित रेल्वेगाड्यांची सुधारित वेळ तपासावी, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील वेळ
रेल्वेचे नाव, जुनी वेळ (येणे/जाणे), नवीन वेळ (येणे/जाणे)
हिंगोली - मुंबई जनशताब्दी, सकाळी 9:30 / 9:34, सकाळी 9:35 / 9:40
मुंबई - नांदेड वंदे भारत, संध्याकाळी 6:48 / 6:50, संध्याकाळी 6:53 / 6:55
दौंड - निजामाबाद एक्सप्रेस, रात्री 12:45 / 12:50, रात्री 1:05 / 1:10
advertisement
निजामाबाद - पुणे एक्सप्रेस, सकाळी 8:20 / 8:25, सकाळी 8:24 / 8:30
अमृतसर - नांदेड सचखंड, सकाळी 9:40 / 9:45, सकाळी 10:00 / 10:05
मराठवाडा संपर्क क्रांती, संध्याकाळी 6:55 / 7:00, संध्याकाळी 7:15 / 7:20
नरसापूर - नगरसोल SF, पहाटे 4:30 / 4:35, पहाटे 4:50 / 4:55
चेन्नई - नगरसोल साप्ताहिक, सकाळी 9:55 / 10:00, सकाळी 10:05 / 10:10
advertisement
रामेश्वरम - ओखा एक्सप्रेस, सकाळी 9:55 / 10:00, सकाळी 10:05 / 10:10
हिसार - हैदराबाद एक्सप्रेस, संध्याकाळी 6:55 / 7:00, संध्याकाळी 7:15 / 7:20
काचीगुडा - मनमाड अजिंठा, पहाटे 4:40 / 4:45, पहाटे 5:25 / 5:30
धर्माबाद - मनमाड मराठवाडा, सकाळी 9:45 / 9:50, सकाळी 9:50 / 9:55
नगरसोल - जालना DEMU, संध्याकाळी 7:43 / 7:45, संध्याकाळी 7:53 / 7:55
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 10:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
वंदे भारत ते जनशताब्दी एक्स्प्रेस, 1 जानेवारीपासून रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल, संभाजीनगरहून कोणती ट्रेन कधी धावणार?











