माहूरगडाचे महंत मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 95 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
- Published by:Prachi Amale
Last Updated:
महाराजांच्या निधनामुळे माहूर गडावर शोककळा पसरली असून भक्तांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
नांदेड : तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे आज निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे वय 95 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. उद्या रविवारी दुपारी तीन वाजता माहूर गडावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. महाराजांच्या निधनामुळे माहूर गडावर शोककळा पसरली असून भक्तांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
सन 1978 पासून ते आजतागायत देवस्थानचे महंत म्हणून गादीवर विराजमान होते. तब्बल 4 तप (48 वर्षे) त्यांनी या गादीवर राहून तप:साधनेत व्यतित केले. ते वैकुंठवासी झाल्याने असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत. महाराजांच्या निधनावर खासदार अशोक चव्हाण यांनीही शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या देवाज्ञेमुळे आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.
महाराजांनी… pic.twitter.com/nBtC2KLuwl
— Ashok Chavan (@AshokChavan1958) April 4, 2026
advertisement
अशोक चव्हाणांनी वाहिली श्रद्धांजली
माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या देवाज्ञेमुळे आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. महाराजांनी आपल्या जीवनकार्यात केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर सेवा व मानवतेचीही शिकवण दिली. माहूर गडावरील दत्त शिखर संस्थानची आध्यात्मिक परंपरा त्यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने जपली. महाराजांच्या रूपात एक थोर विचारवंत आणि मार्गदर्शक हरपले आहे. त्यांचे कार्य आणि शिकवण भक्तांच्या माध्यमातून सदैव अजरामर राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 9:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माहूरगडाचे महंत मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 95 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक







