जळगाव हादरलं! 3 वर्षाच्या सावत्र मुलीसोबत बापाचं धक्कादायक कृत्य, आईनेही दिली साथ
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
या घटनेत सावत्र बापाने तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव ((इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून एक धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. या घटनेत सावत्र बापाने तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेलसवाडी येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेने ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीची आई आणि सावत्र बापाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरी घेटे या महिलेला पहिल्या पतीपासून तीन वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा अशी दोन मुलं होती. आपल्या पतीला सोडून तीनच महिन्यांपूर्वी या महिलेनं आपला प्रियकर अजय घेटे याच्यासोबत लग्न केलं. दरम्यान शुक्रवारी अजय घेटे याने आपल्या तीन वर्षीय सावत्र मुलीच्या डोक्यावर दांड्याने वार केला. यानंतर तिचा गळा आवळून खून केला.
advertisement
या घटनेनंतर मुलीचा मृतदेह महिलेच्या माहेरी म्हणजेच बेलसवाडी येथे घेऊन जात आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचा बनाव केला गेला. मात्र, ग्रामस्थांना संशय आल्याने याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर हत्येचा सदर प्रकार हा उघडकीस आला असून याप्रकरणी मुलीची आई आणि सावत्र बापाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना धमकी
view commentsदरम्यान जळगावमधून आणखी एक घटना समोर आली आहे. यात भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आमदार संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीकडून जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली. माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या घरी सांत्वनासाठी गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून सावकारे यांना धमकी आल्याची माहिती समोर येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2024 9:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगाव हादरलं! 3 वर्षाच्या सावत्र मुलीसोबत बापाचं धक्कादायक कृत्य, आईनेही दिली साथ


