परभणी हादरलं! आधी आईवर अत्याचार, मग मुलीलाही बनवलं वासनेचा शिकार, मायलेकीवर 5 महिने विकृती
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एका अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका नराधमाने विवाहित महिलेसह तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत.
परभणी: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एका अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका नराधमाने विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. यानंतर आरोपीनं पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीला देखील आपल्या वासनेचा शिकार बनवलं. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच नराधमाने मायलेकीवर अशाप्रकारे अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गणेश कारभारी काळे असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याने मानवत तालुक्यातील एका महिलेच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर त्याच आरोपीने नंतर त्या महिलेच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीलाही धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून १९ ऑक्टोबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गणेश काळे याने मागील पाच ते सहा महिन्यांपासून पीडितेच्या आईचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्याने पीडितेच्या आईचे काही फोटोही काढले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने आईला गप्प केले. या धमकीचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याने माझ्यावरही बळजबरीने अत्याचार केले. याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं.
advertisement
जेव्हा पीडितेच्या आईने याबद्दल आरोपीला जाब विचारला, तेव्हा आरोपीने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. याशिवाय, त्याने पीडितेच्या आईचे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली. आरोपीच्या या सततच्या अत्याचाराला आणि त्रासाला कंटाळून अखेरीस पीडित मुलीने गणेश कारभारी काळे याच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचार, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे मानवत तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
view commentsLocation :
Parbhani,Maharashtra
First Published :
October 21, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परभणी हादरलं! आधी आईवर अत्याचार, मग मुलीलाही बनवलं वासनेचा शिकार, मायलेकीवर 5 महिने विकृती