Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयातून आली मोठी अपडेट, डॉक्टर म्हणाले...

Last Updated:

Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे पाटील यांची आता कशी प्रकृती? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतलं. मागच्या चार दिवसांपासून त्यांचं मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू होतं. सोमवार-मंगळवार निर्जळी उपोषण केलं, या उपोषणावर तातडीनं कोर्टात सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी सरकारने पाच मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर उपोषण सोडलं आहे.
मनोज जरांगे यांनी मुंबई सोडल्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशिरा त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात अॅडमिट केलं. उपोषणामुळे जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. डॉक्टरांनी त्यांची संपूर्ण तपासणी केली असून, त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना किमान दोन आठवडे पूर्ण आराम करणे आवश्यक आहे. त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असून उपचारांना सुरुवात झाली आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे मराठा समाजात दिलासा व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतल्याचेही दिसत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन मराठा संघटनांकडून करण्यात आले आहे.
advertisement
मुंबईत उपचार घेण्याची इच्छा असतानाही उपचारांसाठी मनोज जरांगे पाटील मध्यरात्रीच छत्रपती संभाजी नगर येथील गेलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. आझाद मैदानावरील उपोषण आंदोलन संपल्यानंतर सर्व मराठा आंदोलकांनी व्यवस्थित माघारी जाण्याचे आवाहन करताना मी स्वतः मात्र काही दिवस उपचारासाठी इथेच म्हणजे मुंबईतच थांबणार असल्याची घोषणा करणारे जरांगे पाटील मात्र उपोषण आंदोलन संपल्यानंतर काही वेळातच मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले. उपचारांसाठी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील गेलक्सी हॉस्पिटल मध्ये भरती झाले आहेत. सध्या गेलक्सी हॉस्पिटल मध्ये जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयातून आली मोठी अपडेट, डॉक्टर म्हणाले...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement