अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील Video दाखवले, अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न, हरामखोराला इंगा दाखवला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
आरोपीने मालाडमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडे कृत्य केले. परंतु मुलीने संपूर्ण घटना तिच्या वडिलांना सांगितली.
मुंबई : अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सुनील शंकर पवार असून तो ४७ वर्षांचा आहे. कांदिवली पश्चिम येथे तो वास्तव्याला आहे.
मुंबईच्या मालाड भागातील ही अतिशय धक्कादायक घटना आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी अल्पवयीन मुलींचा पाठलाग करायचा, त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवायचा आणि नंतर त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यास सांगायचा. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे
आरोपीने मालाडमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत असेच काहीसे केले, परंतु मुलीने संपूर्ण घटना तिच्या वडिलांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
advertisement
अटक केलेल्या आरोपीचे नाव सुनील शंकर पवार आहे.
पोलिसांनी प्रथमत: गुन्हा दाखल केला.नंतर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपी सुनील पवार याला पोलीस न्यायालयात हजर करतील. सध्या या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीच्या अटकेची माहिती मालाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यन्त चव्हाण यांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 8:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील Video दाखवले, अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न, हरामखोराला इंगा दाखवला









