होळीनिमित्त प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर दरम्यान धावणार विशेष गाड्या

Last Updated:

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर दरम्यान विशेष सुपरफास्ट गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

News18
News18
प्रगती बहुरूपी 
नागपूर : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर दरम्यान विशेष सुपरफास्ट गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे होळीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. सणानिमित्त वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने सुरू केलेल्या या गाड्या मार्च 2025 पासून चालवल्या जाणार आहे.
advertisement
होळीच्या पार्श्वभूमीवर चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे 
मुंबई-नागपूर सुपरफास्ट स्पेशल ही 02139 क्रमांकाची ट्रेन आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे. रविवार आणि मंगळवार या दोनच दिवस ही ट्रेन चालणार आहे. ट्रेन क्रमांक मुंबई (सीएसएमटी) येथून दुपारी 12.20 वाजता सुटेल आणि नागपूरला 3.10 वाजता पोहचेल. या ट्रेनच्या प्रवासाच्या तारखा 9, 11, 16, 18 मार्च 2025 या असतील.
advertisement
त्यानंतर ट्रेन क्रमांक 02140 ही सुद्धा रविवार आणि मंगळवारलाच असणार आहे. नागपूरहून रात्री 8.00 वाजता निघणार आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.30 वाजता मुंबईला पोहचेल. मार्च मधील 9,11,16,18 याच तारखेला या ट्रेन असतील. ही ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा हे सर्व स्टॉप घेईल.
advertisement
पुणे-नागपूर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 01469 ही आठवड्यातून एकदा मंगळवार याच दिवशी असणार आहे. पुण्याहून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 मिनिटांनी पोहोचेल. या ट्रेनच्या प्रवाशाच्या तारखा 11 आणि 18 मार्च 2025 असणार आहे.
ट्रेन क्रमांक 01470 ही बुधवारला असणार आहे. 12 आणि 19 मार्चला नागपूरहून सकाळी 8.00 वाजता सुटेल आणि पुण्याला रात्री 11.30 वाजता पोहचणार आहे. ही ट्रेन उरुळी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा हे सर्व स्टॉप घेणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
होळीनिमित्त प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर दरम्यान धावणार विशेष गाड्या
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement