Nanded : आंचलने हंबरडा फोडला, सक्षमच्या हत्या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, म्हणाले 'निर्घृणपणे मारला म्हणून..'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Prakash Ambedkar On Saksham Tate Case : प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत या प्रकरणावर वक्तव्य केलं. माझी पत्नी अंजली आंबेडकर आज नांदेडमध्ये सक्षम ताटेची आई आणि आंचलला यांना भेटण्यासाठी येणार आहे.
Nanded Crime News : काही दिवसांपूर्वी नांदेडमधील एका घटनेने ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली होती. आंतरजातीय विवाहाला विरोध केल्यानंतर सक्षम ताटे नावाच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या प्रेयसीने म्हणजेच आंचलने स्वत:च्या वडिलांवर आणि भावांवर गंभीर आरोप केले अन् फिर्याद देखील नोंदवली होती. अशातच या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अशातच आता सक्षमच्या हत्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे.
जातीय हल्ल्यात तो निर्घृणपणे मारला गेलाय - प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत या प्रकरणावर वक्तव्य केलं. माझी पत्नी अंजली आंबेडकर आज नांदेडमध्ये सक्षम ताटेची आई आणि आंचलला यांना भेटण्यासाठी येणार आहे. सक्षम हा 20 वर्षांचा बौद्ध तरुण होता. त्याच्या आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी केलेल्या जातीय हल्ल्यात तो निर्घृणपणे मारला गेला होता. अंजलीसोबत वंचित आघाडीच्या नांदेड जिल्हा पदाधिकारी असतील कारण आम्ही शोकाकुल कुटुंबांसोबत एकता व्यक्त करतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
advertisement
आंचलला किती दुःख आणि विश्वासघात...
अंजली आणि मी आंचलला किती दुःख आणि विश्वासघात सहन करावा लागत आहे याची कल्पना करू शकत नाही. अकल्पनीय नुकसानाच्या वेळी तिचे धाडस दुर्लक्षित राहू नये. सक्षमला न्याय मिळायला हवा. सक्षमच्या आईला न्याय मिळायला हवा. वंचित आघाडी सक्षमला न्याय मिळण्यासाठी त्यांना पाठिंबा देईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
advertisement
My wife, Anjali Ambedkar, will be in Nanded today to meet the mother and fiancée of Saksham Tate, the 20-year-old Buddhist youth who was brutally killed in a caste-motivated attack by his fiancée’s father and brothers.
Anjali will be accompanied by VBA Nanded District… pic.twitter.com/7RSEHYfbWc
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) December 3, 2025
advertisement
मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी
दरम्यान, नांदेडमधील या भयंकर घटनेनंतर आंचलने सक्षमच्या पार्थिवाशी विवाह केला. एवढ्यावर न थांबता तिने स्वतःच्या वडील आणि दोन भावांविरोधात पोलिसात धाडसाने साक्षही दिली आहे. सक्षमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील आंचलने केली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणात सर्व आरोपींना अवघ्या 12 तासात अटक केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 8:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded : आंचलने हंबरडा फोडला, सक्षमच्या हत्या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, म्हणाले 'निर्घृणपणे मारला म्हणून..'


