बांगलादेशच्या बहिष्कारानंतर T20 वर्ल्ड कपचं शेड्यूल बदललं, टीम इंडियाचे सामने कधी अन् कुठे?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि श्रीलंकेमध्ये 7 फेब्रुवारीपासून सुरू होणारा टी-20 वर्ल्ड वादात सापडला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने वर्ल्ड कपमध्ये भारतात खेळायला नकार दिला.
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये 7 फेब्रुवारीपासून सुरू होणारा टी-20 वर्ल्ड वादात सापडला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने वर्ल्ड कपमध्ये भारतात खेळायला नकार दिला, तसंच आपले सामने श्रीलंकेमध्ये खेळवावेत, अशी मागणी केली. बांगलादेशची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली, त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला आहे. बांगलादेशच्या बहिष्कारामुळे आता टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकातही बदल झाले आहेत. बांगलादेश वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यामुळे आता त्यांच्याऐवजी स्कॉटलंडची टीम टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे.
बांगलादेशची टीम वर्ल्ड कपच्या ग्रुप सी मध्ये होती, त्यामुळे स्कॉटलंडलाही ग्रुप सी मध्येच टाकण्यात आलं आहे. स्कॉटलंड त्यांचे ग्रुप स्टेजचे 3 सामने कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात आणि एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. स्कॉटलंड कोलकात्यामध्ये वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंडविरुद्ध खेळेल, तर मुंबईमध्ये त्यांचा सामना नेपाळविरुद्ध होईल.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश झाला आहे, त्यामुळे इतर ग्रुपमधल्या कोणत्याच टीमच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला नाही. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या 20 टीमना प्रत्येकी 5-5 टीमच्या 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. या 4 ग्रुपमधल्या टॉप-2 टीम या सुपर-8 स्टेजसाठी क्वालिफाय करतील. यानंतर सुपर-8 मधल्या टॉप-4 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. तसंच सेमी फायनलमध्ये विजयी झालेल्या टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळतील.
advertisement
स्कॉटलंडचं वेळापत्रक
स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडिज- 7 फेब्रुवारी, कोलकाता
स्कॉटलंड विरुद्ध इटली- 9 फेब्रुवारी, कोलकाता
स्कॉटलंड विरुद्ध इंग्लंड- 14 फेब्रुवारी, कोलकाता
स्कॉटलंड विरुद्ध नेपाळ- 17 फेब्रुवारी, मुंबई
टीम इंडियाचं वेळापत्रक
भारत विरुद्ध अमेरिका- 7 फेब्रुवारी, मुंबई
भारत विरुद्ध नामिबिया- 12 फेब्रुवारी, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान- 15 फेब्रुवारी, कोलंबो
भारत विरुद्ध नेदरलँड्स- 18 फेब्रुवारी, अहमदाबाद
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 10:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बांगलादेशच्या बहिष्कारानंतर T20 वर्ल्ड कपचं शेड्यूल बदललं, टीम इंडियाचे सामने कधी अन् कुठे?










