advertisement

APMC Market Rate: डाळिंब खातंय चांगलाच भाव, शनिवारी आल्याला आणि शेवग्याच्या शेंगाला काय मिळाला दर?

Last Updated:

शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.

+
Pomegranate

Pomegranate Price: डाळिंबानं मार्केट खाल्लं, पुणे बाजारात नवा उच्चांक, किलोला किती मिळाला दर? Video

मुंबई: शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
आल्याची आवक वाढली: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1078 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 724 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3765 ते 6765 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 13 क्विंटल आल्यास 5800 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याचे दर स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 83 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये सर्वाधिक 25 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 5500 ते 6500 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 18 क्विंटल शेवग्यास 8000 ते 12000 रुपये दरम्यान सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाच्या दरात चढ-उतार: आज राज्याच्या मार्केटमध्ये 309 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 60 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 500 ते 7500 रुपये दरम्यान सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल डाळिंबास 15000 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market Rate: डाळिंब खातंय चांगलाच भाव, शनिवारी आल्याला आणि शेवग्याच्या शेंगाला काय मिळाला दर?
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement