नंदुरबारमध्ये ऐन दिवाळीत भीषण अपघात, चांदशैली घाटात मृतांचा खच, 6 भाविकांचा जागीच मृत्यू

Last Updated:

Accident in ChandShaili Ghaat: ऐन दिवाळी सणाच्या काळात नंदुरबारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

News18
News18
ऐन दिवाळी सणाच्या काळात नंदुरबारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर काहींना पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्याची सोय करण्यात आली आहे. या अपघातीतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघातात चांदशैली घाटात झाला. यावेळी अस्तंबा यात्रेवरून काही भाविक पीकअप वाहनाने पुन्हा आपल्या घरी परतात होते. पण हा घाट चढताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी काही मीटर खोल दरीत कोसळली. या अपघात इतका भीषण होता की जागीच सहा भाविकांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालं. बचावकार्य सुरू आहे. गंभीर जखमींनी अन्य ठिकाणी हलवण्याचं काम सुरु आहे. पीकअप वाहनात क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवल्याने हा अपघात घडला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
advertisement
खरं तर, चांदशैली हा सातपुडा पर्वत रांगेतील अत्यंत अवघड घाट समजला जातो. या घाटात अनेक नागमोडी वळणं आणि तीव्र चढ उतार आहेत. त्यामुळे वाहनांमध्ये मर्यादीत प्रवासी घेऊन जावं लागतं. असं असताना अस्तंबा यात्रेवरून भाविकांना घेऊन हे वाहन चांदशैली घाटात आलं आणि अपघाताची घटना घडली. अस्तंबा यात्रा ही आदिवासी समुदायासाठी अत्यंत पवित्र आणि मोठी यात्रा समजली जाते. या यात्रेसाठी मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातून आदिवासी बांधव जात असतात. दरम्यान, ऐन दिवाळीत अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नंदुरबारमध्ये ऐन दिवाळीत भीषण अपघात, चांदशैली घाटात मृतांचा खच, 6 भाविकांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement