नरेश म्हस्केंची फिल्डिंग फेल, मुलाचं तिकीट कापलं, शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंकडून मोठा धक्का
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना जोरदार झटका दिला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुलाचं तिकीट कापलं आहे.
महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून युतीची घोषणा जाहीर करण्यापासून स्वबळावर निवडणूक लढण्यापर्यंत मोठ्या हालचाली कराव्या लागत आहेत. अशात शेवटच्या दिवशी अनेकांना लॉटरी लागत आहे. तर काहींना मोठा झटका बसत आहे. अशात आता एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना जोरदार झटका दिला आहे.
ठाणे महानगर पालिकेतून नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के इच्छुक होता. म्हस्के पिता पुत्रांनी यासाठी तयारी देखील केली होती. नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या मुलाला आरामात तिकीट मिळेल, अशी चर्चा होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना जोरदार धक्का दिला आहे. नरेश म्हस्केंच्या मुलाचं तिकीट कापलं आहे.
advertisement
मुलगा आशुतोष म्हस्के याला तिकिट मिळावं, यासाठी नरेश म्हस्केंनी स्वत: फिल्डिंग लावली होती. मात्र म्हस्केंचे डाव अपयशी ठरले आहेत. ठाण्यात इतरही अनेक दिग्गज नगरसेवकांचं तिकीट कापण्यात आलं आहे. यामुळे शिंदे गटात मोठा संताप उमटत आहे. अशात बंडोबांना थंड करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यात दाखल झाले आहेत.
ठाण्यातील आनंदमठ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झालेल्या उमेदवारांची समजूत घालत आहेत. अनेक नाराज दिग्गज नगरसेवकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनधरणी करत आहेत. युती झाल्याने ठाण्यातून अनेक दिग्गजांची उमेदवारी कापल्याचं ते उमेदवारांना सांगत आहेत. मात्र यामुळे अनेक दिग्गज शिवसेना नगरसेवक नाराज झाले आहेत.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 12:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नरेश म्हस्केंची फिल्डिंग फेल, मुलाचं तिकीट कापलं, शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंकडून मोठा धक्का










