OnePlus 15 फोन झाला ₹25000 ने स्वस्त! अॅमेझॉन सेलमध्ये बंपर सूट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Amazon चा Year End Sale सेल सध्या स्मार्टफोन खरेदीदारांसाठी मोठी संधी घेऊन आला आहे. OnePlus चा लेटेस्ट फ्लॅगशिप, OnePlus 15 सध्या चर्चेत आहेत. कारण तो योग्य ऑफर्ससह ₹50,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. हा प्रीमियम-सेगमेंट डील विशेषतः पॉवरफूल परफॉर्मेंस आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट हव्या असलेल्या यूझर्ससाठी आकर्षक आहे.
12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह OnePlus 15 व्हेरिएंट सध्या Amazon वर ₹72,999 मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. जो त्याच्या लाँच किमती ₹76,999 पेक्षा कमी आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही HDFC बँक किंवा Axis Bank क्रेडिट कार्डने पैसे दिले तर तुम्हाला ₹4,000 चं इंस्टंट डिस्काउंट मिळतं. ज्यामुळे किंमत आणखी कमी होते.
advertisement
याव्यतिरिक्त, Amazon ची एक्सचेंज ऑफर ही डील आणखी आकर्षक बनवते. तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल, तर तुम्हाला त्याच्या कंडीशन आणि मॉडेलनुसार ₹44,450 पर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. तुमच्या फोनची किंमत जरी 20,000 च्या आसपास असली तरी, OnePlus 15 ची प्रभावी किंमत अजूनही 50,000 च्या खाली येते, जी या सेगमेंटमध्ये एक महत्त्वाचा फायदा आहे.
advertisement
OnePlus 15 चे स्पेसिफिकेशन्स काय आहेत? : फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 15 मध्ये 6.78-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे जो 1.5K रिझोल्यूशन, 165Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्सचा पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. हा डिस्प्ले स्मूथ स्क्रोलिंग आणि गेमिंगसाठी उत्कृष्ट मानला जातो. फोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आहे, जो टॉप-लेव्हर परफॉर्मेंस प्रदान करतो.
advertisement
advertisement









