वाल्मीक तुरुंगात पण चेल्याकडून रक्तरंजित खेळ, मंगेश काळोखेंवर 13 वार, खोपोली प्रकरणात मोठी अपडेट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
रायगड जिल्ह्यातील खोपोलीत शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली.
खोपोली: रायगड जिल्ह्यातील खोपोलीत शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. अंगावर काटा आणणाऱ्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुख्य आरोपी रवींद्र देवकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि इतर साथीदारांना अटक करण्यात आली आहे. खालापूर न्यायालयाने सर्व नऊ आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजकीय वैमनस्यातून हत्या
खोपोलीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय वाद विकोपाला गेल्याने ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे. शुक्रवारी (26 डिसेंबर) सकाळी मंगेश काळोखे यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा ३८ सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाल्याचं दिसत आहे.
advertisement
सीसीटीव्ही व्हिडीओनुसार, टोळक्याने २४ ते २७ वार करत ही हत्या केली. यावेळी रवींद्र देवकरचा बॉडीगार्ड आणि वाल्मीक कराडचा साथीदार असलेल्या आरोपीनं २७ पैकी १३ वार त्याने एकट्यानेच केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. या प्रत्यक्ष हल्ल्यात रवींद्र देवकरचा मुलगा देखील असल्याचं दिसून येत आहे. सर्व आरोपी अटकेत असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
advertisement
एकाच कुटुंबातील ४ आरोपींसह ९ जणांना अटक
याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये रवींद्र देवकर, उर्मिला देवकर (पत्नी), धनेश देवकर (मुलगा), दर्शन देवकर (मुलगा), विशाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार अशा नऊ जणांचा समावेश आहे.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 12:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाल्मीक तुरुंगात पण चेल्याकडून रक्तरंजित खेळ, मंगेश काळोखेंवर 13 वार, खोपोली प्रकरणात मोठी अपडेट











