advertisement

जिम ट्रेनर सचिन माने हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नीने थेट नावचं घेतलं, शेवटच्या फोन कॉलशी आहे कनेक्शन

Last Updated:

सचिनच्या नातेवाईकांनी आणि पत्नीने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेमुळे हा खून झाल्याचा दावा केला आहे.

News18
News18
सोलापूर : सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका तीस वर्षे युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. सैफुल येथील एका झाडाला गळफास घेऊन घेतलेल्या स्थितीत आढळून आला. सदर युवक हा 14 दिवसापासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार विजापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सचिन मच्छिंद्र माने असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी खून झाला असावा, असा संशय असून, पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. दरम्यान मृत सचिनच्या बायकोने गंभीर आरोप केले आहेत.
सचिन माने हे फिटनेस ट्रेनर होते. 14 मार्च पासून सचिन माने हा पत्नी कल्याणी हिला अर्धा तासात घरी येतो म्हणून निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. मात्र 14 दिवसानंतर 27 मार्च रोजी बेपत्ता झाल्याची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. शुक्रवारी सैफुल येथील आधार हॉस्पिटलपासून एक किलोमीटर अंतरावरील झुडुपात सागवान गळफास दिसून झाडाला घेतल्याचे आले.
advertisement

काय म्हणाली पत्नी? 

सचिन मानेचा मृतदेह सापडला असून ही हत्या नसून घातपात असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. सचिनच्या नातेवाईकांनी आणि पत्नीने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेमुळे हा खून झाल्याचा दावा केला आहे. तसेच त्या महिलेला अटक झाली पाहिजे, आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजेस अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. मृत सचिनची पत्नी म्हणाली, माझा नवरा कुठे आहे? कुणी मारून टाकलं माझ्या नवऱ्याला? शेवटचा फोन ज्या पोरीला झाला तिची चौकशी झालीच पाहिजे, त्या मुलीनेच माझ्या नवऱ्याला मारुन टाकले आहे. त्या महिलेची, तिच्या नवऱ्याची आणि भावाची चौकशी झाली पाहिजे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by news18 Marathi (@news18marathi)



advertisement

नेमकं काय आहे प्रकरण?

शुक्रवारी सैफुल येथील आधार हॉस्पिटलपासून एक किलोमीटर अंतरावरील झुडुपात सागवान गळफास दिसून झाडाला घेतल्याचे आले. बांधकामासाठी वापरात असलेल्या प्लास्टिक पाइपने गळफास आहे. त्याच परिसरात त्याची दुचाकीही होती. माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उतरवला, शासकीय रुग्णालयात हलवले. शवविच्छेदनानंतर आत्महत्या की खून याचा उलगडा होईल, असे पोलिस म्हणाले. खुनाच्या दिशेनेही तपास सुरू केल्याचे सांगितले. सचिन माने यांच्या मागे पत्नी कल्याणी, तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा परिवार आहे..
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिम ट्रेनर सचिन माने हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नीने थेट नावचं घेतलं, शेवटच्या फोन कॉलशी आहे कनेक्शन
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement