नीलेश घायवळला जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहायचं होतं, परंतु विरोधकांनी आधीच... आईचा धक्कादायक गौप्यस्फोट

Last Updated:

Nilesh Ghaywal ZP Election: पुण्याच्या कोथरूड भागात दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करूनचौकशीचा ससेमिरा लागताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला पळून गेलेल्या गुंड नीलेश घायवळ याची आई कुसुम घायवळ यांनी कुटुंबाची बाजू न्यूज १८ 'लोकमत'समोर मांडली.

नीलेश घायवळ आणि त्याची आई कुसुम घायवळ
नीलेश घायवळ आणि त्याची आई कुसुम घायवळ
पुणे : गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. अनेक राजकारणी मंडळी निवडणुकीची वाट पाहत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढच्या दोन महिन्यांत बहुप्रतिक्षित निवडणूक होणार आहे. राजकारणी लोक जसे निवडणुकीची वाट पाहत होते, तसेच पुणे आणि नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातला 'बॉस' अर्थात नीलेश घायवळ देखील जिल्हा परिषद निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत होता. पुढच्या दोन महिन्यात त्याला निवडणुकीला उभे राहायचे होते, असा गौप्यस्फोट करून त्याआधीच त्याच्या विरोधकांनी त्याला अडकविण्याचा कट रचला, असा दावा नीलेश घायवळ याची आई कुसुस घायवळ यांनी केला.
पुण्याच्या कोथरूड भागात दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करूनचौकशीचा ससेमिरा लागताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला पळून गेलेल्या गुंड नीलेश घायवळ याची आई कुसुम घायवळ यांनी कुटुंबाची बाजू न्यूज १८ लोकमतसमोर मांडली. घायवळ कुटुंबाची बाजू समोर येत नसल्याने नीलेशच्या आई वडिलांनी उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल केले. त्यानंतर नीलेशच्या आईने गुरुवारी न्यूज १८ लोकमतशी संवाद साधून गेल्या दोन-चार महिन्यांतल्या घडामोडींवर भाष्य केले.
advertisement

राजकारणी लोक खूप वाईट, त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचे नाही

कुसुम घायवळ म्हणाल्या, निलेशने स्वत:हून काही केले नाही, त्याच्याकडून करवून घेतले गेले. न्यायालयाने त्याला अनेक गुन्ह्यांत निर्दोषही सोडले. त्यानंतर आपण चांगले आयुष्य जगायचे, गुन्हेगारीच्या घाणीत आता जायचे नाही, असे त्याने मला सांगितले. मागच्या चार वर्षांपासून आम्ही सगळेच चांगले जीवन जगत होतो. परंतु राजकारणी लोक खूप वाईट आहेत. त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचे नाही. त्यांनी राजकारणात येऊ नये, गुन्हेगारीत राहावे आणि जेलमध्येच जावे, अशी राजकारण्यांची इच्छा आहे.
advertisement

नगर जिल्ह्यातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार होता

नीलेशला राजकारणात प्रवेश करायचा होता. दोन महिन्यावर निवडणुका आल्या आहेत. नगर जिल्ह्यातील सोनेगाव जिल्हा परिषदेतून तो उभे राहणार होता, असा गौप्यस्फोट नीलेशच्या आईने केला. नीलेशने राजकारणात येऊ नये, त्याआधीच त्याला बाजूला करण्याचे षडयंत्र त्याच्या विरोधकांनी रचले, असा दावा नीलेशच्या आईने केला.

नीलेशने गुन्हेगारीतच राहावी यामागे मोठे राजकारण आहे

advertisement
माझी मुले सुधारण्याचा प्रयत्न करत होती. निलेशला राजकारणाचे वेड आहे. दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते.मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही. मला दोन लेकरं आहेत. त्यांनी पळून जावे असे कोणात्या आईला वाटते. लेकरांनी खून करावा, असे कुणाला वाटते. पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षापासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. पण राजकारणी लोक त्याला फसवतात, त्याने गुन्हेगारीतच राहावे, यासाठी ते प्रयत्न करतात, असे नीलेशची आई म्हणाली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नीलेश घायवळला जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहायचं होतं, परंतु विरोधकांनी आधीच... आईचा धक्कादायक गौप्यस्फोट
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement