राणे बापलेकांच्या मतांची बेरीज केली तरी... ओमराजे निंबाळकरांचं कडक उत्तर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nitesh Rane: सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकी नितेश राणे यांनी धाराशिवच्या स्थानिक शिवसेना नेत्यांना दिली.
धाराशिव : लोकशाहीत जनता हीच बाप असते, जनताच तुमच्या सत्तेचा माज उतरवेल, अशा शब्दात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप नेते, मंत्री नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकी नितेश राणे यांनी धाराशिवच्या स्थानिक शिवसेना नेत्यांना दिली. धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना इशारा दिला.
नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या तिघांच्या मतांची बेरीज केली तरी....
नितेश राणे यांच्या टीकेला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कडक शब्दात उत्तर दिले. नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या तिघांचे मताधिक्य एकत्र केले तरी मी निवडून आलेल्या मतापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मला जनतेने दिलेला आशीर्वाद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाऊन, त्यांची सभा होऊनही साडे तीन लाखांच्या फरकाने मी धाराशिव मतदारसंघातून विजयी झालो आहे. लोकशाहीत जनता हीच बाप असते, असे ओमराजे म्हणाले.
advertisement
आपण एका निवडणुकीत जिंकलो, आपले उमेदवार निवडून आले म्हणजे आपण बाप झालो, असे होत नाही. शेवटी ही लोकशाही प्रक्रिया आहे. तुम्हाला सत्तेचा माज आलाय. जनताच तुमच्या सत्तेचा माज उतरवेल, अशा शब्दात ओमराजे यांनी नितेश राणे यांच्यावर पलटवार केला.
धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि स्थानिक शिवसेनेत काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. शिवसेना नेते तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आहे. त्याच, अनुषंगाने भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी शिवसेना नेत्यांना थेट इशाराच दिला.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
June 08, 2025 9:42 PM IST