Silai Machine Scheme : महिलांना घरबसल्या कमवण्याची संधी! शिलाईमशीन खरेदीसाठी सरकार देतंय पैसे; अर्ज कसा अन् कुठे करावा?

Last Updated:

Women Subsidy Scheme : राज्य सरकारने ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना घरबसल्या शिलाई व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली जाते.

News18
News18
महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देत 'पंचायत समिती शिलाई मशिन योजना' लागू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशिन खरेदीसाठी 90% अनुदान मिळणार आहे. म्हणजे त्यांना फक्त उरलेली 10% रक्कम भरून स्वतःची शिलाई मशीन सहज मिळवता येईल.
योजनेचा उद्देश:
ही योजना ग्रामीण महिलांना घरबसल्या शिलाईचा व्यवसाय सुरु करण्याची संधी देते, ज्यामुळे त्यांना आर्थिक उत्पन्न मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात.
योजनेचे फायदे:
शिलाई मशिनसाठी लागणाऱ्या खर्चाचा 90% भाग सरकारकडून मिळतो, त्यामुळे महिलांना फक्त उरलेले 10% पैसे भरावे लागतात.
महिलांना घरबसल्या शिलाई व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्वावलंबन वाढते.
advertisement
प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र असलेल्या महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
पात्रता:
अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्षे असावे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील सदस्य किंवा रेशन कार्ड धारक असावा.
अर्जदाराकडे शिवणकाम प्रशिक्षण पूर्ण केले असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
advertisement
विधवा किंवा अपंग महिलांसाठी विशेष तरतूद असून त्यांना प्राधान्य दिले जाते; अशा महिलांनी संबंधित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रांची यादी:
आधार कार्ड
वैध मोबाईल नंबर
उत्पन्न प्रमाणपत्र
जन्मतारीख प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
रहिवासी प्रमाणपत्र
रेशन कार्ड
शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र
विधवा/अपंगत्व प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
अर्ज प्रक्रिया:
अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागेल. तिथे तुम्हाला योजनेचा अर्ज फॉर्म उपलब्ध होईल. फॉर्म मिळाल्यानंतर, तो काळजीपूर्वक भरावा आणि अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी. तयार अर्ज व कागदपत्रे जमा करण्यासाठी ताच कार्यालय वापरा. अर्ज जमा केल्यानंतर, पावती घेणे विसरू नका, कारण ही पावती भविष्यात अर्जाची स्थिती तपासण्यासाठी किंवा इतर कार्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Silai Machine Scheme : महिलांना घरबसल्या कमवण्याची संधी! शिलाईमशीन खरेदीसाठी सरकार देतंय पैसे; अर्ज कसा अन् कुठे करावा?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement