WhatsApp स्टेटस ठेवून तरुणाची रेल्वेसमोर उडी! विवाहित महिलेशी प्रेमसंबंध, अखेरच्या मेसेजमध्ये म्हणाला 'तुझ्या मुलाला माझं...'

Last Updated:

Parbhani Crime News : प्रेमसंबंध अधिक घट्ट होऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या या नात्याला कुटुंबीयांकडून तीव्र विरोध होऊ लागला. त्यानंतर विराटने टोकाचं पाऊल उचललं.

Parbhani Crime Virat khose young man ends life
Parbhani Crime Virat khose young man ends life
Parbhani Crime News : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यातून एका 25 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उशिरा रात्री घडली. विराट खोसे असं या मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसवर (Status) भावनिक संदेश ठेवून नातेवाईकांना पाठवला होता. एक दोन नव्हे तर 20 जणांना त्याने मेसेज केला अन् टोकाचं पाऊल उचललं.

रात्री 10:30 वाजता रेल्वेखाली मारली उडी

मिळालेल्या माहितीनुसार, माणिकचे गावातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. ही महिला पतीच्या छळाला कंटाळून माहेरी राहायला आली होती, याच काळात त्यांचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या या नात्याला कुटुंबीयांकडून तीव्र विरोध होऊ लागला. या विरोधामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या विराट खोसे यांनी रविवारी रात्री सुमारे 10:30 वाजता रखळगाव शिवारात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवले.
advertisement

आकस्मिक मृत्यूची नोंद

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व कायदेशीर पंचनामा केला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

शेवटच्या मेसेजमध्ये काय लिहिलं?

माझा लास्टचा मेसेज आहे. गुड बाय.. पल्लवी... तुला माझं प्रेम, माझा जीव गेल्यावरच कळेन. माझ्या जिवाला काही झालं तर त्याला जबाबदार पल्ल्वी राहिल. तीन वर्षानंतर ती माझ्या लाईफमध्ये आली. मी तिच्या लाईफमध्ये आलो नाही. पण काय करू लय प्रेम करतो मी तिच्यावर, त्यामुळं मला लय टेन्शन येतंय. पल्लवी तू टेन्शन घेऊ नको. मी मुलगी नाही, मुलगा आहे म्हणून माझ्या जीवाला काही झालं तरी कुणी येणार नाही. मुलगी असतो तर सगळ्यांनी उठाव केला असता. पण तुला मुलगा झाला तर माझं नाव त्याला ठेव. तुला विराट तुला लय आवडतंय ना... मुलगी जर झाली तर स्वामीज्ञा मला हे नाव लय आवडतय. मी जीव दिल्यावर कुणाला वाईट वाटणार नाही. फक्त माझ्या आई-वडिलांना दु:ख होईल. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे ना... माझा अॅक्सिडेन्ट झाला तेव्हाच मी मरायला पाहिजे होतं. तीन वर्ष मला आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद... माझा आणि तुझा फोन माझ्याजवळ आहे. त्याच सगळं काही आहे. हाईड फोटो पण त्यात आहे बघ.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/परभणी/
WhatsApp स्टेटस ठेवून तरुणाची रेल्वेसमोर उडी! विवाहित महिलेशी प्रेमसंबंध, अखेरच्या मेसेजमध्ये म्हणाला 'तुझ्या मुलाला माझं...'
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement