तुम्ही ‘त्यांचे’ वारस असाल तर लगेच करा अर्ज, दर महिन्याला मिळणार 10000 रुपये मानधन!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
1975 च्या राष्ट्रीय आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांच्या वारसांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सरकारकडून त्यांना दर महिन्याला मानधन मिळणार आहे.
जालना: आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांसाठी व त्यांच्या वारसांसाठी आनंदाची बातमी आहे. आणीबाणी मध्ये सामाजिक आणि कारणामुळे तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या वारसांना मानधन पुन्हा सुरू करून त्यामध्ये घसघसीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
1975 ते 77 दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी सत्तेवर असताना राष्ट्रीय आणीबाणीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे अनेक राजकीय नेते कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगवासात ठेवण्यात आले. सामाजिक व राजकीय कारणांनी तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांना पूर्वी दहा हजार रुपये व त्यांच्या वारसांना पाच हजार रुपये एवढं अनुदान मिळायचं.
advertisement
या अनुदानात आता वाढ करण्यात आली आहे. एक महिना पेक्षा जास्त तुरुंगवासात राहिलेल्या नागरिकांना 20000 रुपये मासिक मानधन मिळणार आहे. एक महिन्यापेक्षा कमी तुरुंगवास सहन केलेल्या नागरिकांना दहा हजार रुपये एवढं मानधन मिळणार आहे.
आणीबाणीमध्ये तुरुंगवास सहन केलेल्या नागरिकांच्या वारसांना एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी 10 हजार तर एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी 5000 रुपये एवढं मासिक अनुदान असणार आहे. त्याचबरोबर तुरुंगवासात असताना 18 वर्ष पूर्ण केल्याची अट देखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी व लाभार्थींच्या वारसांनी 25 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Jul 30, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुम्ही ‘त्यांचे’ वारस असाल तर लगेच करा अर्ज, दर महिन्याला मिळणार 10000 रुपये मानधन!






