फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण, मध्यरात्री मूळगावी तरुणीवर अंत्यसंस्कार, नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश
- Published by:Ravindra Mane
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
सातारा जिल्ह्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील जीवन संपवलेल्या महिला डॉक्टरवर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: सातारा जिल्ह्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने शुक्रवारी आत्महत्या केली. त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला. हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपल्यावर पीएसआय गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केला. आणि प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यामुळे मी जीव देत आहे, असं लिहून महिला डॉक्टरने आयुष्याचा शेवट केला.
या प्रकरणात आता राजकीय कनेक्शन देखील समोर आली आहे. फलटणमधील एका खासदाराचा संबंधित महिला डॉक्टरवर दबाव होता. पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता, अशी माहितीही आता समोर आली आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.
दरम्यान, रात्री उशिरा महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मयत डॉक्टर मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याच्या कवडगाव येथील रहिवाशी होत्या. रात्री उशिरा त्यांचं पार्थिव फलटणवरून मूळ गावी आणण्यात आलं. यावेळी गावात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. तरुणीचं पार्थिव गावात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
advertisement
महिला डॉक्टरच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली. मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रकरणी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शवविच्छेदन अहवालात नक्की काय म्हटलं?
view commentsपोस्ट मॉर्टमचा अँडव्हान्स रिपोर्ट सातारा पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालात मृत्यूपूर्वी पीडित तरुणीवर यांच्यावर कुठलेही व्रण किंवा खुणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन बीडच्या दिशेने रवाना झाले होते.
Location :
Phaltan,Satara,Maharashtra
First Published :
October 25, 2025 8:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण, मध्यरात्री मूळगावी तरुणीवर अंत्यसंस्कार, नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश


