'माझ्या नादी लागू नको', डॉक्टर महिलेला छळणाऱ्या PSI बदणेचा जुना VIDEO समोर

Last Updated:

साताऱ्यातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात फलटण ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदणे याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. आता त्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

News18
News18
साताऱ्याच्या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात फलटण ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदणे याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गोपाल बदणेनं आपल्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर बदणेच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसत आहेत. मयत तरुणीसोबतचं त्याचं कनेक्शन देखील समोर येत आहेत. एक एक पुरावे पोलिसांच्या हाती लागत आहेत.
अशात आता गोपाल बदणेचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात बदणे हा अंगावर वर्दी न घालता रस्त्यावर काही गाड्या अडवताना दिसत आहे. याबाबत एका तरुणाने त्याला जाब विचारल्यानंतर त्याने नरमाईची भूमिका घेत घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

व्हिडीओत नक्की काय आहे?

advertisement
पोलीस वर्दीवर नसलेला हा बदणे रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची चौकशी करत असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. हा प्रकार सुरू असताना एका वाहन चालकाने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचं चित्रीकरण केलं. तसेच अंगावर वर्दी नसताना तू गाड्या कशा काय तपासत आहे? माझी गाडी का अडवली? असा जाब समोरील तरुण विचारताना दिसत आहे. तरुणाच्या सजगतेमुळे गोपाल बदणे घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
advertisement
यावेळी संबंधित तरुण बदणेला विविध जाब विचारत आहे. "तुला कुठे पण गाड्या अडवायचा अधिकार कुणी दिला रे... तू पोलीस आहेस ना? याचं उत्तर दे... माझ्या नादी लागू नको... माझी गाडी आधी चेक कर... माझ्या गाडीत नक्की काय आहे, ते तू दाखव आधी... तू कुणाला फोन नको कुणाला करू, तू मला का अडवलं, याचं उत्तर दे..." अशा शब्दात तरुण बदणेला जाब विचारताना दिसत आहे. यावेळी मी तुझ्या नादी लागत नाही, असं म्हणत बदणे घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.
advertisement
बदणे सध्या फलटण पोलीस ठाण्यातील बलात्कार प्रकरणात संशयित असून तो पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे या व्हिडिओनं पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे आणि तो अधिकृत चौकशीसाठी वापरला जाणार का? याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. तूर्तास या व्हिडीओमुळे बदणेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'माझ्या नादी लागू नको', डॉक्टर महिलेला छळणाऱ्या PSI बदणेचा जुना VIDEO समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement