advertisement

पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, आंदोलनादरम्यान दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ

Last Updated:

भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी दगडफेकीचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन
भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन केले. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यावेळी भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूकडील पदाधिकारी एकमेकांसमोर आले. यावेळी झालेल्या झटापटीत कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. जवळपास तासभर हा राडा सुरू होता. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने दगड भिरकावल्याचा आरोप करण्यात येतो आहे. झालेल्या दगडफेकीत एक-दोन काँग्रेस कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले. काँग्रेस नेते मोहन जोशी आणि प्रशांत जगताप यांनी भाजपच्या आंदोलनाचा निषेध केला.
पुणे भाजपने दुपारी १२ वाजता काँग्रेस भवनासमोर आंदोलनाला सुरुवात केली. काही मिनिटांत भाजपचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेस भवनासमोर जमा झाले. सुरुवातीला सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा प्रचंड फौजफाटा असल्याने भाजप कार्यकर्ते आतमध्ये शिरू शकले नाहीत. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांना दुखापत झाली.
advertisement

आंदोलनादरम्यान काही जणांकडून दगडफेक

भाजपच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमकपणे चालून गेले. यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. घोषणांच्या आवाजाने काँग्रेस भवन दणाणून गेले. पोलिसांनी हस्तक्षेप करूनही कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. त्याचवेळी कुणीतरी दगड फेकून मारले. यात काँग्रेसचे एक दोन कार्यकर्ते जखमी झाले. दगड लागल्याने त्यांच्या नाकातोंडातून रक्त आले.

वादावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले...

advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. शिवराय आमचा स्वाभिमान आहेत. टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. संविधानाच्या मूळ प्रतीवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे.
advertisement

फडणवीस यांच्याकडून सपकाळांवर पलटवार

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणारा टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा अशी जर काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूल चालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान यांची तुलना करताना हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, ते कुठल्या शाळेत शिकलेत? असा बोचरा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, आंदोलनादरम्यान दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement