advertisement

छातीत लाथाबुक्क्या, कलाकेंद्रावर नर्तिकेचा डान्स बघायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू, मित्रांनीच दारू पाजून घेतला जीव

Last Updated:

धाराशिवमध्ये कलाकेंद्रावर नर्तिकेचा डान्स बघायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याच्याच मित्रांनी दारू पाजून हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

News18
News18
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: मागील काही दिवसांपासून धाराशिव, बीड आणि सोलापूर येथील कलाकेंद्रावर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बार्शी येथील नर्तिका पूजा गायकवाडच्या प्रेमात एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केली होती. त्याने कार आतून बंद करत स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा कलाकेंद्रावर बारी (नर्तिकेचा डान्स) बघायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
सतीश मुंडे असं मृत पावलेल्या ३७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी तो आपल्या काही मित्रांसह धाराशिव जिल्ह्यातील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेला होता. आता त्याची हत्या केल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मित्रांनी दारू पाजून बारी पाहण्यासाठी नेलं आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरोपी मित्रांनी लाथा बुक्क्यांनी सतीश मुंडे पोटावर आणि छातीवर मारहाण केली. यात सतीशचा मृत्यू झाल्याचं सतीशच्या वडिलांची पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
शेख आजमुद्दीन ,शेख रौफ , संजय गीते ,मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्रात बारी पाहायला गेलेल्या तरुणाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनं कला केंद्राचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छातीत लाथाबुक्क्या, कलाकेंद्रावर नर्तिकेचा डान्स बघायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू, मित्रांनीच दारू पाजून घेतला जीव
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement