Pune: आंदेकर टोळीतल्या नंबरकाऱ्याच्या भावाला ठोकले, खडी मशीन चौकात थरार, रिक्षातून जाणाऱ्या गणेशवर गोळीबार

Last Updated:

Pune Ganesh Kale Murder: कोमकर टोळीतल्या आरोपींवर दोषारोपपत्र दाखल होण्याच्या आधीच आंदेकर टोळीतील नंबरकाऱ्याच्या भावाला ठार केल्याने पुणे पोलिसांच्या डोळ्यासमोर टोळीयुद्धाचा रक्तरंजित थरार सुरू असल्याचे दिसते.

गणेश काळे हत्या
गणेश काळे हत्या
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : मारणे, कोमकर आणि आंदेकर टोळीला गजाआड केल्यानंतर पुण्यातील टोळीयुद्ध शमल्याचे पुणे पोलीस अभिमानाने सांगत होते. परंतु पोलिसांना थेटपणे कृतीतून आव्हान देऊन आंदेकर टोळीतील दत्ता काळे याच्या चुलत भावाला म्हणजेच गणेश काळे याला गोळ्या झाडून मारण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.
शाळकरी मुलगा आयुष कोमकरच्या हत्येने पुण्यासह महाराष्ट्र हादरून गेला होता. कोमकर याच्या हत्याकांडातील आंदेकर टोळीतील सर्वच आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल होण्याच्या आधीच आंदेकर टोळीतील नंबरकाऱ्याच्या भावाला ठार केल्याने पुणे पोलिसांच्या डोळ्यासमोर टोळीयुद्धाचा रक्तरंजित थरार सुरू असल्याचे दिसते.

घटना नेमकी कशी घडली?

कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात २ आरोपींनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळे याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या गणेश काळे याला लागल्या. तो गतप्राण झाला. त्याचवेळी दुचाकीवरून उतरलेल्या दोघांनी त्याच्या शरीरावर कोयत्याचे वार केले. काही मिनिटांतच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दोन आरोपी गणेशच्या मागावर होते. त्यांनी गणेशला रिक्षात बसू दिले, काही अंतर कापल्यानंतर त्यांनी गणेशला लक्ष्य केले.
advertisement
गणेश काळे असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी दत्ता काळे याचा भाऊ असल्याची माहिती आहे. दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी आहे. तो अजूनही तुरूंगात आहे. गणेशवर गोळीबार करण्याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.

हे टोळीयुद्ध नाही, पुणे पोलिसांची माहिती

advertisement
पुण्यात भडकलेल्या टोळीयुद्धाची चर्चा होत असताना गणेश काळे याच्यावरील हल्ला हा टोळीयुद्धातून झालेला नाही, असे स्पष्टपणे पुणे पोलिसांनी सांगितले. गणेशच्या खुनाचे कारण आम्ही लवकरच शोधून काढू, आरोपींना देखील लगोलग अटक करण्याचा प्रयत्न करू, असे पुणे पोलिसांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: आंदेकर टोळीतल्या नंबरकाऱ्याच्या भावाला ठोकले, खडी मशीन चौकात थरार, रिक्षातून जाणाऱ्या गणेशवर गोळीबार
Next Article
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement