Pune: 'मी AB फॉर्म खाल्ला नाही', शिंदे गटाच्या उद्धव कांबळेंनी सांगितली Inside स्टोरी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ मधील शिंदे गटाच्या उमेदवारानं सगळ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे. येथील शिंदे गटाचे उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर एबी फॉर्म फाडून गिळल्याचा आरोप आहे.
महानगर पालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी जोरदार राडे झाले. काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांचं तिकीट नाकारलं, कुठे एबी फॉर्म दिला नाही, कुठे दुसऱ्यानेच एबी फॉर्म पळवला, अशा अनेक घटना शेवटच्या दिवशी घडल्या. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ मधील शिंदे गटाच्या उमेदवारानं सगळ्या राज्याचं लक्ष वेधलं.
कारण येथील शिंदे गटाचे उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर एबी फॉर्म फाडून गिळल्याचा आरोप आहे. त्यांनी निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोरच आपल्याच पक्षाच्या एका उमेदवाराचा एबी फर्म फाडून गिळला आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी उद्धव कांबळेंना नोटीस बजावली आहे.
यानंतर स्वत: उद्धव कांबळे पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी एबी फॉर्म फाडण्यामागची इनसाईड स्टोरी सांगितली आहे. त्यांनी अर्ज फाडल्याचं कबुल केलं आहे. मात्र आपण फॉर्म खाल्ला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
advertisement
घडलेल्या घटनेबद्दल विचारलं असता, उद्धव कांबळे म्हणाले की, माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत की, मी फॉर्म गिळला... खाल्ला... वगैरे. पण तसं काही झालेलं नाहीये. मी फॉर्म खाल्ला नाहीये. मी जेव्हा फॉर्म भरला. त्यानंतर मला समजलं की तिथे अर्जाची छाननी सुरू आहे. आणि तिथे मच्छिंद्र ढवळे यांनी आमच्या पक्षाकडून फॉर्म भरल्याचं समजलं. त्यांना मी व्यक्तीश: ढवळेंना ओळखत नाही. त्यांचा पक्षाशी काही संबंधही नाही, तरी त्यांनी कुठून तरी एबी फॉर्म मिळवला आणि तिकडे सबमीट केला आहे. परंतु मी वरिष्ठांना विचारलं, तेव्हा त्यांनी मीच अधिकृत उमेदवार असल्याचं सांगितलं. तसं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिलं.
advertisement
जेव्हा मला प्रकार समजला तेव्हा मी कार्यालयात पोहोचलो. भावनेच्या भरात तो माझ्याकडून फाटला गेला आहे. मी ते १०० टक्के अॅक्सेप्ट करतोय. माझी चुकी झाली आहे. पण प्रभाग क्रमांक ३६ मध्ये मी अनेक वर्षांपासून काम करतोय. मी एकनिष्ठ आहे. ढवळे यांना मी किंवा शिवसेनेचे कोणतेच पदाधिकारी ओळखत नाहीत. त्यांनी तो फॉर्म कुठून मिळवला, हेही आम्हाला माहीत नाही, असंही कांबळे म्हणाले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: 'मी AB फॉर्म खाल्ला नाही', शिंदे गटाच्या उद्धव कांबळेंनी सांगितली Inside स्टोरी










