Marathi Serial : नव्या वर्षात 3 नव्या मालिका, पण स्टार प्रवाहची फेमस सीरियल 8 महिन्यातच गाशा गुंडाळणार  

Last Updated:
2026 वर्ष सुरू झालं आहे. नव्या वर्षात मराठी टेलिव्हिजनवरही नव्या मालिका सुरू होत आहेत. नव्या मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. पण नवं येणार म्हणजे जुन्याला टाटा बाय बाय करावं लागणार. नव्या मालिका सुरू होत असताना दुसरीकडे प्रेक्षकांची एक लाडकी जोडी निरोप घेणार आहे.  
1/7
स्टार प्रवाहच्या सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. नव्या वर्षातही मनोरंजनाचा महापर्वणी घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आणि 'तुझ्या सोबतीने' या दोन नव्या मालिका आणि 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चं चौथं पर्व नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

advertisement
2/7
'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि क्रांतिकारी जीवनावर आधारित ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही भव्य मालिका 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7.30 वाजता  स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 

3/7
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या ऐतिहासिक मालिकेसोबतच 'तुझ्या सोबती'ने ही नवी मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एतशा संझगिरी आणि अजिंक्य ननावरे ही नवी जोडी प्रमुख भूमिकेत असलेली ही मालिका 12 जानेवारीपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  

4/7
स्टार प्रवाहच्या 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांचं भरभरुन मिळालं. या तिन्ही पर्वातले स्पर्धक आपल्या टॅलेण्टने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत आहेत. स्पर्धकांवर सुरांचे संस्कार करण्यासाठी मी होणार सुपरस्टारचा चौथा सीजन सज्ज आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3 जानेवारी पासून रात्री 9 वाजता सुरांची ही मैफल अनुभवता येणार आहे

5/7
या तीन मालिका सुरू होत असताना स्टार प्रवाहची एक प्रसिद्ध मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका संध्याकाळी 7.30 वा सुरू होणार आहे. त्यामुळे 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका रात्री 10.30 वा सुरू होणार आहे. मग 10.30  वाजता लागणारी 'कोण होतील तू काय झालीस तू' या मालिकेचं काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 

6/7
कोण होतील तू काय झालीस तू ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या या मालिकेनं अवघ्या 8 महिन्यात गाशा गुंडळला आहे. 

7/7
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी आणि जयदीपची जोडी पुन्हा एकदा या मालिकेत पाहायला मिळाली. अभिनेता मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement