खुनातील आरोपीची पुणे पोलिसांनी भर चौकातून काढली धिंड
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
काही दिवसांपूर्वी कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत एका मुलीचा खून झाला होता.
सुमित सोनावणे, प्रतिनिधी, उरुळी कांचन (हवेली):- पुण्याच्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० वर्षीय तरुणीच्या निर्घृण खुनाने हादरलेल्या परिसरातच पोलिसांनी कारवाई करत आरोपींची बाजारपेठेतून धिंड काढण्यात आली. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून पोलिसांचे कौतुक केले.
काही दिवसांपूर्वी कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत पायी चाललेल्या तरुणीला आरोपीने शरीर सुखाची मागणी केली होती. त्याचा विरोध तरुणीने केल्याने २० वर्षीय तरुणीचा खून झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
तरुणीचा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात उरुळी कांचन पोलिसांनी तत्परतेने तपास करून संशयित आरोपीला अटक केली. आज आरोपीची बाजारपेठेतून धिंड काढून पोलिसांनी त्याला लोकांसमोर उभे केले. ज्यामुळे परिसरात गुन्हेगारांना कडक इशारा देण्यात आला.
advertisement
गुन्हेगारांवर ठोस कारवाई झाल्यावर त्यांना धडा मिळेल यातून जनतेचा पोलिसांवर अधिक विश्वास दृढ होण्यास मदत होईल, असे उरुळी कांचन पोलीस म्हणाले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 25, 2025 7:22 PM IST


